
नागपूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या जरांगे पाटील यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करावे, सोबतच सरकारनेही त्यांच्याशी बोलले पाहिजे असा सल्ला काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिला. यावेळी त्यांनी जातिनिहाय जनगणना हाच आरक्षणाच्या संघर्षावर एकमेव उपाय असल्याचे सांगितले.