देशातील पहिली अंध नोटरी महिला नंदिता त्रिपाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nandita Tripathi is first blind woman notary in country

देशातील पहिली अंध नोटरी महिला नंदिता त्रिपाठी

नागपूर : पैसा, सत्ता, संपत्ती, शिक्षण कितीही असले तरी माणूस ही प्रजातीच अशी आहे की तो असामाधानी असतो. आपल्या कर्म अन्‌ नशिबाला दोष देणारे अनेक जण दिसतात. आपल्या परिस्थीतीवर समाधानी राहणारे यामध्ये बोटावर मोजण्याइतकेच असतील. यापैकी एक म्हणजे ॲड. नंदिता त्रिपाठी. नंदीता या जन्मत: अंध असून देशातील पहिली नोटरी महिला म्हणून त्यांनी ओळख मिळवली असून तब्बल पाच हजारावर प्रकरणे त्यांनी हातळली आहेत.

नंदिता यांच्या आई डॉ. शिम्मी डुबे या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून सेवानिवृत्त झाल्या. तर, दिवंगत वडील शाम डुबे यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय होता. नंदिता यांना एक मोठी बहीण व एक भाऊ. दुर्दैवाने त्यांचा भाऊ आणि नंदिता यांना जन्मत:च अंधत्वाने ग्रासले. मात्र, खचून न जाता संपूर्ण डुबे कुटूंबियांनी संघर्ष सुरू ठेवला. या संकटाकडे दुर्लंक्ष करीत सकारात्मकतेने नंदिता यांच्या आईने मुलांचे शिक्षण सुरू ठेवले. भविष्यामध्ये आपल्या अशा या कमकुवत बाजूचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून एका अपत्याला वकील बनविण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

आईचे हे स्वप्न लहानपणापासून गुणवत्ता यादीत झळकणाऱ्या नंदिता यांनी आवाहन मानून पूर्ण केले. बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शहरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयातून त्यांनी विधी शाखेचे शिक्षण घेतले आणि वकिली व्यवसायात पदार्पण केले. जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालयासह उच्च न्यायालयामध्ये त्या आज आत्मविश्‍वासाने प्रकरणे लढत आहेत. सात वर्षानंतर,

देशातील पहिली अंध नोटरी महिला नंदिता त्रिपाठी

२०१० साली सहाय्यक सरकारी वकील म्हणून संधी त्यांना मिळाली. या दरम्यान नोटरी बनण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. यासाठी आवश्‍यक मुलाखतीमध्ये यश मिळवत २०१४ साली त्या नोटरी झाल्या. पती रवींद्र त्रिपाठी, मुलगा तिलक त्रिपाठी अशा त्रिकोणी कुटुंबासह यशाच्या पायऱ्या सर करीत आहेत.

न्यायाधीश निवड प्रक्रियेला आवाहन

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)द्वारे घेण्यात येणाऱ्या न्यायाधीश पदासाठीच्या परीक्षेत दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव जागा नाही. यामुळे, नंदीता यासाठी अपात्र ठरत आहे. या विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून राज्य शासनाला निवेदन देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यावर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा ॲड. नंदिता यांना आहे.

टॅग्स :NagpurwomenBlind