- तुषार पिल्लेवाननागपूर - शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असलेला राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ (वर्धा रस्ता) रोखून धरला. कर्जमुक्तीशिवाय माघार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली..शेवटी सरकारला दोनच दिवसांत नमते घ्यावे लागले. कडूंसह शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावून कर्जमाफी जाहीर करण्यात आली. शेतकऱ्यांच्या संघर्षाचा तसेच आंदोलनाचा हा महामार्ग केंद्रबिंदू ठरला.अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावातून कडू यांनी शेतकऱ्यांसह काढलेला महाएल्गार मोर्चा नागपूरच्या वेशीवर धडकला. वर्धा मार्गावरच शेतकऱ्यांनी ठिय्या मांडल्याने नागपूर ३० तास ठप्प झाले. महामार्ग, हायवे, शहराचे बाहेर जाणारे सर्व रस्ते या आंदोलनाने दणाणले. बच्चू कडू यांनी ‘महाएल्गार’च्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकरी नेते शरद जोशींच्या काळाची आठवण करून दिली..हजारोंच्या संख्येतील हे शेतकऱ्यांचे वादळ पाहून सरकारने पंकज भोयर, आशिष जयस्वाल या राज्यमंत्र्यांना बच्चू कडू यांच्या भेटीसाठी पाठविले. पण, कर्जमाफीची तारीख जाहीर झाल्याशिवाय वाटाघाटी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.न्यायालयाच्या निर्देशानंतर महामार्ग मोकळा करीत खापरी (पुनर्वसन) येथे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. कर्जमाफीच्या घोषणेनंतरच शेतकऱ्यांनी शुक्रवारी गावाकडचा रस्ता धरला. आंदोलनात राज्यभरातून शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या..ढोलताशांचा गजरशुक्रवारी नागपूर विमानतळावरून बच्चू कडू थेट खापरी (पुर्नवसन) येथील आंदोलनस्थळी पोहचले. तेथे त्यांचे शेतकऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. आतषबाजी ढोलताशांच्या गजरात जल्लोष करीत ‘जेसीबी’तून कडू यांच्यावर पुष्पवर्षाव करण्यात आला..सरकारची व्यूहरचना भेदलीगुरुवारी मुंबईत भेटीचा मुहूर्त ठरला. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यातील प्रमुख मंत्री अधिकारी ‘सह्याद्री’ अतिथिगृहावर आले. सरकारने आपल्या व्यूहरचनेतून कमीत-कमी शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळेल, अशी योजना आखली होती. पण, कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी ही व्यूहरचना भेदली..राज्यातील प्रत्येक गरजू-गरीब आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी योजना ठरविली. सरकारकडून ती मान्य करून घेतली. यातूनच ३० जून २०२६ ची तारीख निश्चित झाली. या घोषणेनंतर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.