esakal | RMS चे नॅशनल ट्रान्शीपमेंट सेंटर बुटीबोरीत, गतीने घरपोच मिळणार पार्सल
sakal

बोलून बातमी शोधा

transshipment center

RMS चे ट्रान्शीपमेंट सेंटर बुटीबोरीत, गतीने घरपोच मिळणार पार्सल

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : देशाच्या मध्यभागी असल्याने नागपूरचे लॉजिस्टिक (वाहतूक) क्षेत्रातील महत्त्व सर्वमान्य आहे. यामुळेच कॉर्गोहब (cargo hub ), कॉनकोर डेपो पाठोपाठ नागपूरजवळच ड्रायपोर्ट प्रस्तावित आहे. आता बुटीबोरीत आरएमएस’चे नॅशनल ट्रान्शीपमेंट सेंटरची (national transshipment cente) उभारणी सुरू आहे. रेल्वे आणि पोस्ट विभागाच्या संयुक्तरीत्या उपक्रमामुळे पार्सल वाहतूक देशभरात सुरळीत होण्यासह गतिमान होणार आहे. लॉजिस्टिक हब म्हणून नागपूरच्या विकासाच्या प्रयत्नांना बुस्ट मिळणार आहे. (national transshipment center will build in butibori of nagpur)

हेही वाचा: सेना, राष्ट्रवादींवर पटोलेंचे आरोप, नंतर घुमजाव; म्हणाले...

रेल्वे आणि पोस्ट विभागाने संयुक्तरीत्या सुरू केलेल्या पार्सल सेवेला आता चांगलीच गती मिळाली आहे. अगदी दारापर्यंत सुरक्षित सामान पोहोचण्याचा विश्वास मिळत असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद सातत्याने वाढत आहे. ही सेवा अधिक व्यापक व वेगवान करण्याच्या दृष्टीने रेल्वे मेल सर्व्हिसतर्फे (आरएमएस) बुटीबोरीसह देशभरात चार नॅशनल ट्रान्शीपमेंट सेंटर उभारले जात आहेत. बुटीबोरीतील सेंटर सहा महिन्यांमध्ये कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट्य ठरविण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाउन दरम्यान संपूर्ण देशच बंदिस्त झाला असताना रेल्वे आणि टपाल विभागाने संयुक्तरीत्या पार्सल सेवा आरंभली. प्रामुख्याने वैद्यकीय उपकरणे रस्तेमार्गे देशाच्या विविध भागात पाठविली गेली. दुसऱ्या लाटेदरम्यान देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. रिकामे सिलिंडरही मिळणे कठीण झाले होते. त्यावेळीसुद्धा या सेवेचा उपयोग करीत ऑक्सिजन सिलिंडर पाठविण्यात आले. अल्पावधीत सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच देशाच्या चारही भागातून येणाऱ्या पार्सलच्या वाहतुकीचे योग्य नियोजन क्रमप्राप्त ठरले. पुढे आलेली निकड भागविण्यासाठी रेल्वे मेल सर्व्हिसतर्फे बुटीबोरीसह चार ठिकाणी नॅशनल ट्रान्शीपमेंट सेंटर उभारण्यात येत आहेत.

सेंटरचे महत्त्व -

सध्या नोंदणी झालेले रेल्वे किंवा वाहनातून पत्त्यावर थेट पाठविले जाते. पुढच्या टप्प्यात प्रथम पार्सल नजीकच्या ट्रान्शीपमेंट सेंटरमध्ये जाईल तिथून गरजेनुसार रेल्वे किंवा वाहनातून पुढे पाठविले जाईल. या सुसूत्रतेमुळे पार्सल वाहतूक देशभरात सुरळीत होण्यासह गतिमान होईल.

रेल्वे व टपाल विभागाच्या संयुक्त पार्सल सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सेवा अधिक सुरळीत व गतिमान होण्याच्या दृष्टीने देशभरात चार ठिकाणी नॅशनल ट्रान्शीपमेंट सेंटर उभारले जात आहेत. त्यातील एक बुटीबोरीत असेल. येथील सेंटरमुळे देशभरातील पार्सल वाहतुकीला वेग येईल.
-बी. व्ही. रमण्णा, अधीक्षक, रेल्वे मेल सर्व्हिस, नागपूर.
loading image