
नागपूर : नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी सोलार इंडस्ट्रिज इंडिया लिमिटेडच्या नागपुरातील मुख्यालयातील विविध संरक्षण उत्पादनांच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा शुक्रवारी घेतला. यावेळी त्रिपाठी यांच्यासह सोलारचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, नौदल अधिकारी उपस्थित होते.