

NCP Leader in Trouble After Lavani Dance at Party Office Video Goes Viral on Social Media
Esakal
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूरमधील कार्यालयात लावणी सादर करण्यात आल्याच्या प्रकाराची सध्या चर्चा सुरू आहे. पक्षाच्या कार्यालयात बॅनरवर अजित पवार यांचा फोटो आणि पक्षाचं चिन्हही दिसतंय. राष्ट्रवादीचे शहरातील काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. एका महिला कार्यकर्त्याने लावणी सादर केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नागपूर शहराध्यक्षांना नोटीसही पाठवलीय. तर महिला कार्यकर्त्याने चुकीचं काही घडलं नसल्याचं म्हटलंय.