

Nagpur News
esakal
नागपूर : देशभर गाजत असलेल्या नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे धाडसत्र राबविले. पुणे येथील पेपरफुटी रॅकेटशी संबंध असल्याच्या संशयावरून तीन विद्यार्थ्यांच्या घरांची झडती घेण्यात आली. या कारवाईमुळे विदर्भातील नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.