

Nepal Flood Rescue
esakal
नागपूर: खोल दरीच्या कडेला धावणारी बस, डोळ्यांसमोर कोसळणाऱ्या डोंगरांच्या कडा, तुटलेले पूल आणि नद्यांचे रौद्ररूप... प्रत्येक क्षणी मृत्यू समोर उभा असल्याची भीती मनात होती. तरीही धैर्य न सोडता थरारक प्रवास करीत सुखरूप नागपूर गाठले, अशी आपबिती नेपाळच्या प्रलयातून बचावलेल्या नागपूरकर भाविकांनी ‘सकाळ’सोबत बोलताना सांगितली.