Nagpur Accident: सुटीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; नेरपिंगळाई शोकसागरात, लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार
Indian soldier Accident: सुटीवर घरी आलेल्या जवान कौशल राऊत याचा भीषण अपघाती मृत्यू झाला. नेरपिंगळाई गावावर शोककळा पसरली आहे. लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करत नागरिकांनी या वीराला शेवटचा निरोप दिला.
नेरपिंगळाई : नेरपिंगळाई गावातील २४ वर्षीय जवान कौशल गजानन राऊत याचा मोर्शीवरून गावी परत येत असताना येरला फाट्याजवळ भीषण अपघात झाला. यात तो जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी (ता. एक) संध्याकाळी सहा वाजता घडली.