
New Amrit Bharat Express from Nagpur
Sakal
नागपूर : ओडिशातील ब्रह्मपूर (बेरहाम्पूर) ते गुजरातमधील उधना (सूरत) दरम्यान नवीन अमृत भारत एक्स्प्रेस सुरू झाली आहे. ही गाडी नागपूरमार्गे धावणार आहे. ओडिशा, गुजरात, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना जोडणारी ट्रेन असल्याने विदर्भातील प्रवाशांच्या सुविधेत भर पडली आहे.