Nagpur New City land survey begins with farmer cooperation
Sakal
नागपूर : हिंगणा तालुक्यातील मौजा गोधणी (रिठी) आणि मौजा लाडगाव (रिठी) या ठिकाणी १ हजार ७१०.११ एकरवर प्रस्तावित ‘नवीन नागपूर’साठीच्या जमिनीकरता संयुक्त मोजणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या सहकार्याने आठवडाभरात ही मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाचे ध्येय असून, यात शेतकऱ्यांसह विविध यंत्रणेचे सहकार्यही लाभत आहे.