esakal | nagpur : अभिनयाच्या ‘नशे’तून मिळाली नवी ‘दिशा’
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

अभिनयाच्या ‘नशे’तून मिळाली नवी ‘दिशा’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अलीकडे पंधरा वर्षांचं वय झालं की, गुंडगिरी अंगात शिरल्याचे चित्र आजूबाजूला दिसते. विशी-पंचविशीच्या उंबरठ्यावरची तरुण मुलं. व्यसनांच्या विळख्यात सापडलेली दिसतात. रात्री चौकात बसून झिंगत दिसतात. त्यांचं आयुष्य एका बंदिस्त चौकटीत असते. परंतु नागपुरात दोन वर्षांपूर्वी नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड' चित्रपटाची शूटिंग झाली. हा चित्रपट थिएटर बंद असल्याने कुठेच प्रदर्शित झाला नाही. तर या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वादाला देखील तोंड फुटले आहे. मात्र या चौका-चौकात चुकीच्या पद्धतीने "नाइट लाइफ' जगण्याचा मनसोक्त आनंद लुटणारी मुले क्राईम जगतात रमली असती.

परंतु ‘झुंड’ मध्ये अभिनय करण्याची संधी काही मुलांना मिळाली आणि यांच्या आयुष्याचा कॅनव्हास बदलला. समोर "बिग बी' अर्थात अभियनाचा शहेनशहा अमिताभ बच्चन. बाजूला सैराटमधील ‘परशा अन आर्ची...’ असे सारे डोळे दीपवणारे चित्र नजरेत भरले आणि या मुलांचे आयुष्यच बदलले. ‘झुंड’ चित्रपटाच्या टिझरमध्येही अनेक मुले कॉटन मॉर्केटमधील एका दृश्यात हातात बॅट, रॉड, स्टॅम्प घेऊन झोपडपट्टीतील मुलांची टोळी हल्ला बोलण्यासाठी जात असल्याचे सूचक दृश्‍य शूट केले. यानंतर मात्र या मुलांच्या हातातील हे गुंडगिरीचे साहित्य गळून पडले. अनेक मुले व्यसनांपासून दूर गेले. झोपडपट्टीतील मुलांना झुंडमधील अभिनयाच्या ‘नशे’तून जगण्याची नवी ‘दिशा’ मिळाली.

loading image
go to top