Nagpur University
sakal
नागपूर
Nagpur News : दोनच दिवसांत विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळण्याची शक्यता; उद्या मुलाखती, प्रक्रियेला आला वेग
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकरिता नवीन कुलगुरू नेमण्याची प्रक्रिया दोन महिन्यांपासून रखडली होती.
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकरिता नवीन कुलगुरू नेमण्याची प्रक्रिया दोन महिन्यांपासून रखडली होती. अखेर मुलाखतींना मुहूर्त मिळाला असून रविवारी (ता.३०) राज्यपालांसमोर मुलाखती होणार आहे. त्यानंतर सोमवारी १ डिसेंबरला नव्या कुलगुरूंचे नाव घोषित होण्याची शक्यता आहे.

