शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना हाणला अप्रत्यक्षपणे टोला; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना हाणला टोला; म्हणाले...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेती, व्यापार व उद्योगांचे महत्त्व अधिक आहे. या क्षेत्रात देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित व्यापारी आणि उद्योजक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बुधवारपासून (ता. १७) विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. शरद पवार विदर्भ दौऱ्यात गडचिरोली, वडसा, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना भेटी देणार आहेत.

हेही वाचा: मोनालिसाची किलर ब्यूटी; काळ्या ड्रेसमध्ये पाहून चाहते घायाळ

महाराष्ट्रात प्रादेशिक असमतोल आहे. हा प्रादेशिक असमतोल दूर करायला पाहिजे. याकडे राज्य चालविणाऱ्यांनी लक्ष द्यावे. पाच वर्ष विदर्भातील नेतृत्वाकडे राज्याची सत्ता होती. स्थानिक समस्या सोडवणे त्यांचे कर्तव्य होते, असे म्हणत शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापनेपूर्वी शरद पवार तीन दिवस विदर्भात होते. त्यावेळी त्यांनी अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला होता. या दौऱ्यात त्यांच्या गाडीचे सारथ्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. त्यानंतर सुमारे दोन वर्षांनंतर शरद पवार विदर्भात आले आहेत.

loading image
go to top