Nitin Gadkari
Nitin Gadkari sakal

Nitin Gadkari : सीआआयतर्फे शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर चर्चासत्र

व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या दृष्टीने विद्यापीठाने पुढील २५ वर्षांचे नियोजन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केले.

नागपूर : आत्मनिर्भर भारतासाठी आपल्याला क्षमता आणि उणिवा दोन्ही ओळखून पुढे जावे लागेल. व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या दृष्टीने विद्यापीठाने पुढील २५ वर्षांचे नियोजन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केले.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ए. के. डोरले सभागृहात ‘नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी’ या विषयावर अॅकेडेमिया कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.

सीआयआयचे चेअरमन सुनील चोरडिया, सीआयआय विदर्भ झोनचे चेअरमन शैलेश आवळे, उपाध्यक्ष श्री जामदार, सीआयआय महाराष्ट्रचे संचालक रोशन कुमार, रामदेवबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेश पांडे उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘आपल्या प्रदेशात उद्योग आले तर त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. एका मोठ्या उद्योगामुळे त्यावर आधारित छोट्या उद्योगांनाही चालना मिळते.

त्यासाठी विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणावर जोर देण्याची गरज आहे. यासोबतच औद्योगिक संस्थांनीही आवश्‍यक मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचार करावा.

शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांनी सहकार्य, समन्वय आणि संवाद या त्रिसूत्रीवर काम करणे आवश्यक आहे. विदर्भातील समस्या आणि उणिवा ध्यानात घेऊन एकत्र काम केले तर रोजगार निर्मिती होईल आणि गरिबी दूर होण्यास देखील मदत होईल.

विदर्भात विशेषतः कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात काम करण्यावर भर द्यावा लागेल. कोळसा, कापूस, संत्रा यासारख्या आपल्या जमेच्या बाजू आहेत, त्याचा वापर उद्योग निर्मिती आणि रोजगार निर्मितीसाठी कसा करता येईल,

याचा विचार करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. यावेळी चेअरमन सुनील चोरडिया, सीआयआय विदर्भ झोनचे चेअरमन शैलेश आवळे यांची भाषणे झाली.

Nitin Gadkari
Nagpur Crime : मासोळी शिजविण्याचा वादात तिघांनी डोक्यात घातला दगड ;खुनामुळे सोनेगावात खळबळ दोघांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com