
नागपूर : उत्तम नर्सरी, संत्र्याची गुणवत्ता, मार्केटिंग या त्रिसूत्रीतून विदर्भातील शेतकऱ्यांना उत्पादन आणि उत्पन्न वाढविणे शक्य आहे. येथील शेतकरी जिज्ञासू आणि अभ्यासू असून, त्यांना फक्त मार्गदर्शनाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ॲग्रोव्हिजन फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी वनामती सभागृहात आयोजित संत्रा उत्पादकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.