Nitin Gadkari: बिहार जलसंधारणासाठी पुढे; महाराष्ट्रात मात्र दुर्लक्ष ;केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सूचक नाराजी

Nitin Gadkari : बिहार सरकार नद्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करून पूर व दुष्काळावर उपाययोजना करणार आहे. यासाठी केंद्र सरकारसोबत करार होणार असून, महाराष्ट्रात जलसंधारणाच्या कामांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली
Union Minister Nitin Gadkari speaks about Bihar's river rejuvenation plans and water conservation in Maharashtra.

Union Minister Nitin Gadkari speaks about Bihar's river rejuvenation plans and water conservation in Maharashtra.

esakal

Updated on: 

नागपूर : एका बाजूला दुष्काळ आणि दुसऱ्या बाजूला अतिवृष्टी व पूरस्थिती, अशा नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या बिहार सरकारने जलसंधारणासाठी नद्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय मंगळवारी (ता. ३) बिहार सरकारसोबत करार करणार आहे. याउलट महाराष्ट्रात मात्र अशा कामांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्त केली.

Loading content, please wait...