
नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. उमेश विष्णू राऊत (वय ४०, रा. तुळशीबाग रोड, महाल, विमा दवाखान्याजवळ) असे या आरोपीचे नाव असून तो मेयोतील अतिदक्षता विभागात दाखल आहे. उमेशचा भाऊ मंगेश राऊतने त्याच्यातर्फे न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.