Sukhvinder Singh
Sukhvinder Singhsakal

Nagpur News : नितीन गडकरी साहब हमारे हरमन प्यारे! - सुखविंदर सिंग

नितीन गडकरी यांना मी बडे साहब म्हणतो. पंजाबी मध्ये यासाठी ‘हरमन प्यारे’ असा शब्द आहे.

नागपूर - नितीन गडकरी यांना मी बडे साहब म्हणतो. पंजाबी मध्ये यासाठी ‘हरमन प्यारे’ असा शब्द आहे. मी नेहमी त्यांच्याबद्दल वाचत असतो. त्यांनी देशात केलेली कामे बघत असतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व मला खूप आकर्षित करते,'' या शब्दात सुखविंदर सिंग यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल भाव व्यक्त केले.

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात मानस उद्योग समूहाच्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कांचन गडकरी, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार कृष्णा खोपडे, आमदार टेकचंद सावरकर, बैद्यनाथचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश शर्मा, माजी आमदार आशिष देशमुख, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, माजी आमदार अशोक मानकर, केतकी कासखेडिकर, सारंग गडकरी, निखिल गडकरी, समय बनसोड, सुधीर दिवे, रवी बोरटकर, जयप्रकाश गुप्ता, संदीप जोशी उपस्थित होते.

नितीन गडकरी आणि कांचन गडकरी यांनी सुखविंदर सिंग यांचे स्वागत केले. सुखविंदर यांनी छैय्या छैय्या, जय हो, रमता जोगी, होले होले हो जाएगा प्यार, बन ठन चली यासह त्यांच्या गाजलेल्या गाण्यांनी श्रोत्यांची मने जिंकली.

Sukhvinder Singh
Pune Utsavnama : ‘उत्सवनामा’च्या साडी महोत्सवाला जोडीनेच यायचं!

विकासासाठी प्रयत्नशील : नितीन गडकरी

रस्ते, पूल, मेट्रो आणि पायाभूत सुविधा आवश्यक आहेतच. सुसह्य जीवनासाठी या बाबी महत्त्वाच्या आहेतच. पण कृषी, सामाजिक क्षेत्रात काम करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. सामाजिक दायित्व समजून आम्ही काम करतो. ग्रामीण भागात विशेषतः कृषी क्षेत्रात मोठे काम होणे आवश्यक आहे.

सुखविंदरची शहराची सैर

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी दोन तास मी नागपूर फिरून आलो. नागपुरातील काही खास पदार्थांवर ताव देखिल मारून आलो, असे सांगत सुखविंदर यांनी सर्वांचे लक्ष वेधून गेले. जन्म पंजाब मध्ये पण कर्मभूमी महाराष्ट्र आहे. खूप प्रेम आणि अभिमान आहे मला महाराष्ट्राबद्दल, असेही सुखविंदर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com