बॅडमिंटन अकादमीसाठी सहकार्य करणार; नितीन गडकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari support Badminton Academy state level competition

बॅडमिंटन अकादमीसाठी सहकार्य करणार; नितीन गडकरी

नागपूर : विभागीय क्रीडा संकुलात सुरू झालेल्या राज्य बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सर्व्हिस करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. सोबत अरुण लखानी, मंगेश काशिकर व इतर शहरात जवळपास २५० मैदाने विकसित करण्याचा संकल्प आपण केला आहे. यापैकी एका मैदानावर महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेने (MAHARASHTRA BADMINTON ASSOCIATION) आंतरराष्ट्रीय दर्जाची अकादमी उभारावी. त्यास सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरू झालेल्या राज्य वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी यांनी अकादमीचा उल्लेख केला असता गडकरी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा संघटनेने प्रौढांसाठीही राज्य स्पर्धेचे आयोजन करावे अशी सूचनाही गडकरी यांनी यावेळी केली. भव्य अशा क्रीडा संकुलाची देखभाल करणे किंवा चालवणे आता सरकारसाठी कठीण होत चालले आहे, त्यामुळे ही संकुले आता क्रीडा संस्थांनी चालवावीत असेही ते म्हणाले.कार्यक्रमाला महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी, उपाध्यक्ष श्रीकांत वाड, कोषाध्यक्ष जगदीश जोशी, नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्ष कुंदाताई विजयकर, उपाध्यक्ष श्रीराम पुरोहित, सचिव मंगेश काशिकर उपस्थित होते.

पहिल्या दिवसाचे महत्त्वाचे निकाल ः (पुरुष एकेरी पहिली फेरी)- अन्मेश पाटील (नागपूर) मात जगन्नाथ रासेकर (चंद्रपूर), गोविंद सारडा (अकोला) मात हर्षवर्धन बान्ते (नागपूर), किरण इंगोले (बुलडाणा) मात झुबेन खान (नागपूर), विवेक नगरारे (नागपूर) मात शुभम बुगाडे (कोल्हापूर), आदित्य देरकर (नागपूर) मात चिंतामणी देवगावकर (पुणे), जतिन सिंग परमार (नागपूर) मात क्षितिज सोनटक्के (नागपूर), प्रियांशू रंभाडे (नागपूर) मात वैभव बुवा (पुणे).

(महिला एकेरी - पहिली फेरी) - अनुष्का चंद्रागडे (नागपूर) मात शिवानी शिरे (यवतमाळ), पिनाक रोकडे (नागपूर) मात अलिशा खान (मुंबई उपनगर), पृथा डेकाटे (नागपूर) मात ओजल रजक (पुणे), क्रिपी साजवान (नागपूर) मात मनाली परुळेकर (पुणे), सौम्या मुथा (यवतमाळ) मात आस्था गणवीर (नागपूर), चैताली नायसे (नागपूर) मात सानिया तपकीर (पुणे), शौर्या मडावी (नागपूर) मात इशिता पिसाळ (ठाणे), ऐश्वर्या पिंपळापुरे (नागपूर) मात पारुल देशपांडे (पुणे).

Web Title: Nitin Gadkari Support Badminton Academy State Level Competition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top