'नितीन गडकरींनी कोरोनाकाळात विदर्भाला सांभाळलं' : देवेंद्र फडणवीस

'नितीन गडकरींनी कोरोनाकाळात विदर्भाला सांभाळलं' : देवेंद्र फडणवीस

नागपूर : कोविडच्या धास्तीने मुख्यमंत्री घराच्या बाहेर तर उपमुख्यमंत्री पुण्याच्या बाहेर पडत नाही, असा आरोप करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी विदर्भाला सांभाळल्याचे सांगितले. (Nitin Gadkari taking care of Vidarbha from corona said Devendra Fadanvis)

'नितीन गडकरींनी कोरोनाकाळात विदर्भाला सांभाळलं' : देवेंद्र फडणवीस
रुग्णांची लूट थांबणार! हॉटेल, शाळेतील कोविड केअर सेंटरला दरपत्रक लावणं बंधनकारक

भाजपच्या कार्यकिराणीच्या बैठकीत ते बोलत होते. गडकरी यांनी देशाच्या अनेक भागातून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, आरटीपीसीआर व्हॅन आणली. आपल्या भागात रेमडेसिव्हिरचे उत्पादन सुरू केले. पक्षाने ‘सेवा ही संघटन’ अभियान राबवले. रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन, औषधांसाठी यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली. तथापी, कोव्हिडनंतर अनेक त्रास उद्भवत असल्याने त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आता लक्ष ठेवा

ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्याने त्याचा योग्य वापर होत आहे की नाही, याचे ऑडिट व्हावे, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. कोविडने अनेक कार्यकर्ते गमावले. त्यामुळे प्रत्येकाने नियम व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. शहाराला २६०-२७५ मेट्रिक टनची गरज असताना नागपुरात ९० मेट्रिक टनचे उत्पादन होत होते.

'नितीन गडकरींनी कोरोनाकाळात विदर्भाला सांभाळलं' : देवेंद्र फडणवीस
लग्नाच्या नावावर युवतीची मध्यप्रदेशात विक्री; नागपुरात मुलींची विक्री करणारी टोळी सक्रिय

त्यासाठी प्रयत्न करून ऑक्सिजन मिळवण्यात आले. मेयो, मेडिकल, एम्ससह ७-८ रुग्णालयांना गरजेनुसार ऑक्सिजन उपलब्ध केले आहे. दत्ता मेघे मेघे व रणजित देशमुख यांच्या समूहातील रुग्णालयांनी ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे. अमरावतीसह विदर्भाच्या सर्व क्षेत्रात ऑक्सिजन देण्यात येत आहे. चंद्रपूरमध्ये ४०० बेड्सच्या रुग्णालयाला ऑक्सिजनसाठी वेकोलिने सहकार्य केले आहे, असेही गडकरी म्हणाले.

(Nitin Gadkari taking care of Vidarbha from corona said Devendra Fadanvis)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com