लग्नाच्या नावावर युवतीची मध्यप्रदेशात विक्री; नागपुरात मुलींची विक्री करणारी टोळी सक्रिय

लग्नाच्या नावावर युवतीची मध्यप्रदेशात विक्री; नागपुरात मुलींची विक्री करणारी टोळी सक्रिय

नागपूर : झोपडपट्टी किंवा आर्थिक परिस्थितीने पिचलेल्या कुटुंबातील मुलींना नोकरी किंवा इव्हेंटचे काम करण्याच्या नावावर राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यात लाखों रूपयांत विक्री करणारी टोळ्या उपराजधानीत सक्रीय आहे. अशाच एका टोळीचा छडा बेलतरोडी पोलिसांनी (Nagpur Police) लावला आहे. विक्री करण्यात आलेल्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन महिलांसह टोळीला अटक केली आहे. (gangs who sold girls are active in Nagpur)

लग्नाच्या नावावर युवतीची मध्यप्रदेशात विक्री; नागपुरात मुलींची विक्री करणारी टोळी सक्रिय
रुग्णांची लूट थांबणार! हॉटेल, शाळेतील कोविड केअर सेंटरला दरपत्रक लावणं बंधनकारक

कुणाल अरूण ढेपे (३७) गणेशनगर, कोतवाली, विभा अनिल वरदेकर (४०, गल्ली नं. २, महाल), मुस्कान मोहबुद्दीन शेख (३१, नवीन फुटाळा) आणि भरत रघुनाथ सोळंकी (२४, खापतखेडी, उज्जैन-मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पीडित २२ वर्षीय तरुणी रिया (बदललेले नाव) ही अजनी हद्दीत रामेश्वरी येथे राहते. तिचे लग्न झाले असून तिला ४ वर्षांची मुलगी आहे. काही महिन्यांपूर्वी रियाच्या पतीचा मृत्यू झाला. उदरनिर्वाह करण्यासाठी ती कॅटरिंगच्या कामाला जात होती. या असहाय्यतेचा फायदा आरोपी कुणाल, विभा आणि मुस्कान यांनी घेतला. बाहेरगावी ईव्हेंटचे काम आहे असे रियाला सांगून १९ एप्रिल रोजी सोबत नेले. मुलीला आईच्या घरी सोडून ती आरोपींसोबत निघून गेली. तरुणीला घेऊन आरोपी उज्जैन येथे गेले. तेथे भरत सोळंकी यास १ लाख ७० हजारांत तिला विकले. त्याचप्रमाणे तिच्यावर बळजबरी करून आणि दबाव आणून भरतसोबत तिचे लग्न लावून दिले. भरतकडून पैसे घेऊन आरोपी नागपूरला निघून आले.

घरात ठेवले डांबून

लग्न केल्यानंतर रिया पळून जाऊ नये म्हणून भरतने तिला घरात कोंडून ठेवले. दुसरीकडे बारा दिवस होऊन रिया घरी न आल्याने तिच्या आईला काळजी लागली. तिने मुलीच्या मोबाईलवर संपर्क केला असता मोबाईल बंद येत होता. काहीतरी गडबड आहे हे समजून मुलीच्या आईने बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

सायबर विभागाचे यश

झोन चारच्या सायबर पथकातील दीपक तऱ्हेकर आणि मिथून नाईक यांनी रियाचा तांत्रिक पद्धतीचा वापर करून शोध घेतला. दोन दिवसांपूर्वी ती उज्जैनला असल्याचे कळले. त्यामुळे शुक्रवारी रात्री बेलतरोडीचे ठाणेदार विजयकुमार आकोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विकास मनपिया, बजरंग जुनघरे, गोपाल देशमुख आणि रिया भाऊ हे उज्जैनला रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने बेलतरोडी पोलिसांनी रिया आणि भरतला ताब्यात घेतले.

लग्नाच्या नावावर युवतीची मध्यप्रदेशात विक्री; नागपुरात मुलींची विक्री करणारी टोळी सक्रिय
लग्नाची वरात पडली महागात! ५० हजारांचा दंड; वऱ्हाड्यांची कोरोना चाचणी करण्याची नोटीस

टोळीला केली अटक

भरतची विचारपूस केली असता त्याने रियाला खरेदी केल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे इतर आरोपींची नावे सांगितली. शुक्रवारी रात्रीच पोलिसांनी धडपड करीत कुणाल, विभा आणि मुस्कान यांना ताब्यात घेतले. त्यानंतर शनिवारी रिया आणि भरतला घेऊन पोलिस पथक उज्जैनहून नागपूरला परत आले. पोलिसांनी चौघांनाही अटक केली.

(gangs who sold girls are active in Nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com