esakal | नागपूरकरांनो, संपूर्ण अनलॉक नाहीच! वाचा काय असणार दुकानं आणि इतर सेवांची नवीन वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूरकरांनो, संपूर्ण अनलॉक नाहीच! वाचा काय असणार सेवांची नवीन वेळ

नागपूरकरांनो, संपूर्ण अनलॉक नाहीच! वाचा काय असणार सेवांची नवीन वेळ

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : ज्यात सध्या लॉकडाउन (Maharashtra Lockdown) सुरु आहे. मात्र १ जूनपासून काही ठिकाणी शिथिलता आणण्यात आली आहे. सकाळी ७ ते ११ सुरु असणाऱ्या अत्यावश्यक सेवांच्या दुकानांबरोबरच इतर दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे. नागपूर (Nagpur Unlock) पहिल्या टप्प्यात असल्यामुळे सोमवारपासून सर्व निर्बध संपणार आणि पुन्हा सर्वकाही सुरु होणार अशी आशा नागपूरकरांना होती. मात्र आज पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी पत्रकार परिषद घेत अनलॉकबाबत जिल्ह्यासाठीची नवीन नियमावली जाहीर केली आहे. (nitin raut announced New rules of unlock in Nagpur)

हेही वाचा: बापरे! 'या' वर्षापर्यंत पृथ्वीवरील पाण्याचा साठा पूर्णपणे होणार नष्ट

पालकमंत्र्यांनी सांगितल्यानुसार नागपूर जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचे आकडे पुन्हा वाढू नये म्हणून थोडेफार निर्बध कायम ठेवण्यात येत आहेत. तसंच दुकानांच्या वेळांवरही बंधन आणण्यात आलं आहे.

काय असतील नवे निर्बंध

  • सर्व प्रकारची दुकानं सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या वेळेतच सुरु राहतील.

  • मॉल्स ५० टक्के क्षमतेनुसार संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार.

  • हॉटेल आणि उपहारगृह आणि बार ५० टक्के कॅपिसिटी नुसार रात्री १० वाजेपर्यंत सुरु असतील.

  • सलून, जिम, पार्लर यांना ५० टक्के क्षमतेनं संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे.

  • दारूची दुकानं ५ पर्यंत सुरु राहतील.

  • सिनेमागृहं संध्याकाळी ५ पर्यंत ५० टक्के क्षमतेनं सुरु राहतील.

  • स्कुल, कॉलेज, कोचिंग क्लास बंद राहतील, त्यांचे प्रशासकीय काम सुरू राहू शकेल.

  • धार्मिक स्थळ बंद राहतील ( समितीचे 5 लोकं दैनंदिन पूजा आणि स्वच्छतेसाठी जाऊ शकतील )

  • राजकीय व धार्मिक कार्यक्रम, सोहळ्यांवर पूर्ण बंदी राहील

  • सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम जास्तीत जास्त 100 लोकांच्या उपस्थतीत होऊ शकतील.

संध्याकाळी ५ वाजेनंतर जमावबंदी

नागपुरात सोमवारपासून संध्याकाळी ५ नंतर जमावबंदी लागू असणार आहे. म्हणजेच ५ पेक्षा जास्त लोकांना एका ठिकाणी एकत्र येणार नाही. मात्र संचारबंदी नसणार आहे.

लग्नसमारंभात १०० लोकांना परवानगी

अनलॉकच्या नियमावलीनुसार लग्नसमारंभांना २०० जणांची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता सोमवारपासून नागपूर जिल्ह्यात लग्नसमारंभांना १०० जणांनाच उपस्थित राहता येणार आहे. तर अंत्यसंस्कारासाठी ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा: अखेर 'तो' चिमुकला ठरला अंधश्रद्धेचा बळी; पोटावर चटके देण्यात आलेल्या मुलाचा मृत्यू

सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे सुरु

सोमवारपासून जिल्ह्यात १०० टक्के क्षमतेनं सार्वजनिक वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. मात्र वाहतुकीदरम्यान नागरिकांना उभं राहून प्रवास करण्यात येणार नाहीये.

(nitin raut announced New rules of unlock in Nagpur)

loading image
go to top