
PM Awas Yojana
sakal
तुषार पिल्लेवान
नागपूर : गरिबांच्या ‘स्वप्नातील घर’ साकारण्यासाठी नागपूर महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) ने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. प्रधानमंत्री आवास (शहरी) योजना २.० अंतर्गत ३० हजार घरांच्या उभारणी केली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी अडीच लाखांचे अनुदान मिळणार आहे.