कोरोना घेतोय खासगी क्लासेसची ट्युशन; विद्यार्थीच मिळेनात.. पण काय आहे कारण.. वाचाच  

No admissions in private classes due to corona
No admissions in private classes due to corona

नागपूर : महाविद्यालये आणि शाळांशी टायअप असलेल्या क्लासेसला कोरोनाचा चांगलाच फटका बसला असल्याचे चित्र दिसून येत आहे. अकरावी प्रवेशासाठी शहराची वाट धरणाऱ्या बहुतांशी विद्यार्थ्यांनी यावर्षी कोरोनाच्या भीतीने शहराकडे पाठ फिरविल्याने क्लासेसवर आर्थिक संकट ओढविले आहे.

दहावीचा निकाल लागताच विद्यार्थ्यांची महाविद्यालये शोधण्यापूर्वी क्लासेसमध्ये प्रवेशासाठी गर्दी दिसून येते. क्लासेसकडून केवळ टायअपच नव्हे तर इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर फोकस करुन त्यांचे प्रवेश कसे मिळविता येईल यावर भर असतो. दरवर्षी शहरात अकरावी प्रवेशाच्या निमित्ताने नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुक्यांसह चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, अमरावती यासारख्या जिल्ह्यांतील किमान २० ते २५ हजार विद्यार्थी शहरात येत असतात. 

सध्या पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती महापालिका क्षेत्रांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेदरम्यान येथीलच महाविद्यालयात प्रवेश मिळवीत हे विद्यार्थी जेईई आणि नीट यासाठी क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. यामुळे क्लासेस मोठ्या प्रमाणात फुल्ल असतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील विद्यार्थीही येऊ शकले नाहीत. 

या विद्यार्थ्यांनी आपल्या नजीकच्या महाविद्यालयातच प्रवेशावर भर देत, जिल्ह्यातील क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यावर भर दिला आहे. या प्रकाराने जवळपास सगळ्याच क्लासेसला फटका बसला आहे. त्यामुळे क्लासेसवरही आर्थिक संकट ओढविले आहे.

शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता

नागपूरसारख्या शहरामध्ये क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यामागे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे हा हेतू असतो. मात्र, कोरोनामुळे ते स्वतःच्या शहरात राहिल्यास २०२२ च्या परीक्षेसाठी आवश्यक असलेले योग्य मार्गदर्शन त्यांना मिळणार नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.


"दरवर्षी क्लासेसमध्ये यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात. त्यांच्यासाठी सगळी व्यवस्था क्लासेसच्या माध्यमातून केली जाते. मात्र, यावर्षी विद्यार्थी आलेच नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे".
-डॉ. समीर फाले, 
संचालक, फाले मेडिकल एंटरन्स इन्स्टिट्यूट.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com