ऑफलाइन की ऑनलाइनचा निर्णय केव्‍हा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

No decision taken by Nagpur University on exam is offline or online

ऑफलाइन की ऑनलाइनचा निर्णय केव्‍हा?

नागपूर : राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याचे कुलगुरुंद्वारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना सांगण्यात आले. त्यानुसार विद्यापीठांमध्ये १ जून ते १५ जुलैदरम्यान परीक्षा घेण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले होते. मात्र, नागपूर विद्यापीठाद्वारे अद्याप परीक्षा ऑफलाइन की ऑनलाइन याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. या ढिसाळ नियोजनाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे.

विद्यापीठाद्वारे यापूर्वी परीक्षा मंडळाच्या बैठकीत ऑनलाइन परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विद्यापीठाने तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी कुलगुरूंच्या बैठकीत ऑफलाइनचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विद्यापीठाने लवकरात लवकर परीक्षेबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, याला वीस दिवसांपेक्षा जास्तीचा कालावधी उलटून गेल्यावरही विद्यापीठाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. विशेष म्हणजे, १ जून ते १५ जुलैदरम्यान परीक्षा घेण्याचे ठरलेले आहे. त्यानुसार किमान महिन्याभरापूर्वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणे अपेक्षित असते. मात्र, अद्याप कोणत्या मोडवर परीक्षा घेण्यात येणार आहे, हेच कळले नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.

अनेकांचे नियोजन फसले

विद्यापीठाच्या परीक्षा साधारणतः मार्चमध्ये सुरू होतात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात संपतात. त्यानुसार विद्यार्थी आणि पालक आपल्या कार्यक्रमांचे नियोजन करीत असतात. विद्यापीठाने यापूर्वी १५ मे पासून परीक्षा घेण्याचे ठरविले होते. त्यामुळे पालकांनी अनेक योजना आखल्या. मात्र, अद्याप परीक्षेबाबत निर्णय झाला नसल्याने त्या सर्व फसल्याचे दिसून येत आहे.

विभागांच्या परीक्षा केव्हा?

विद्यापीठाने विभागांना स्वायत्तता प्रदान केली आहे. त्यामुळे विद्यापीठातील उन्हाळी परीक्षांमध्ये त्यांचा सहभाग नसेल. मात्र, त्यांच्या परीक्षा केव्हा होतील, याबाबत विभागांनाही माहिती नाही. त्यामुळे विभागातील विद्यार्थ्यांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.

पावसाळ्यात परीक्षा कशा घेणार?

विद्यापीठाच्या तारखा जाहीर झाल्यावर तब्बल तीन महिने परीक्षा चालणार आहेत. यामधील बरीच केंद्रे ही ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थी केंद्रांपर्यंत कसे पोहचतील, हा प्रश्‍न आहे. शहरी भागात सोयीसुविधा असल्या तरी ग्रामीण भागात अनेकदा संपर्क तुटतो. तेव्हा अशा परिस्थितीत परीक्षा निर्विघ्न कशा होतील हे कळत नाही.

Web Title: No Decision Taken By Nagpur University On Exam Is Offline Or Online

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top