आशिया खंडातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय, पण बुरशीच्या आजाराच्या सुक्ष्म निदानाची सोयच नाही

mucormycosis
mucormycosise sakal
Updated on

नागपूर : म्युकरमायकोसिस (mucormycosis) अर्थात बुरशीच्या आजाराचे निदान (diagnosis of mucormycosis) झाल्यानंतर या आजाराचे सुक्ष्म निरीक्षण करण्यासाठी एमआरआय मशीनची गरज आहे. मात्र, आशिया खंडातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असूनही येथील वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल)मध्ये (government medical college nagpur) १८ महिन्यांपासून रेडिओलॉजी विभाग एमआरआय यंत्राविना सुरू आहे. यामुळे ऐन संकट काळात बुरशीच्या निदानासाठी सीटीस्कॅनचा आधार घ्यावा लागत आहे. दुधाची तहान ताकावर भागवण्याचा हा प्रकार आणखी किती दिवस चालवायचा असा सवाल येथील डॉक्टरांनीच उपस्थित केला आहे. (no mri machine for diagnosis of mucormycosis in nagpur government medical college)

mucormycosis
चंद्रपूरची दारूबंदी अयशस्वी की मंत्री-शासन अयशस्वी? डॉ. अभय बंग यांचा प्रश्न

विदर्भ नव्हेतर छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा या राज्यातून सुमारे २० टक्के रुग्ण मेडिकलमध्ये उपचारासाठी येतात. मात्र दीड वर्षांपासून ‘एमआरआय’ वरील अद्ययावत निदान यंत्रणा बंद आहे. विशेष असे की, मेडिकलमध्ये बुरशीच्या आजाराचे ११० पेक्षा अधिक रुग्ण दाखल असताना या रुग्णांना सीटी स्कॅनपेक्षा एमआरआयद्वारे केले जाणारे निदान अधिक प्रभावी ठरते. मात्र, हे यंत्र बंद आहे. विशेष असे की, नवीन एमआरआय यंत्र खरेदीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मेडिकल प्रशासनाने नवे एमआरआय खरेदी करण्याच्या प्रस्तावावर खनिकर्म विभागातून १६ कोटी रुपयांचा निधी मिळाला. मात्र, त्याच सरकारच्या काळात हाफकिनद्वारे खरेदीची सक्ती केली गेली. यामुळे हा निधी हाफकिनकडे वळता करण्यात आल्यानंतरही एमआरआय यंत्र खरेदी करता आले नाही. यामुळे आतापर्यंत सुमारे १५ हजार रुग्णांना मेयोसह खासगीचा रस्ता दाखवण्याचा प्रकार मेडिकलच्या रेडिओलॉजी विभागाने केला आहे.

अफलातून प्रकार -

मेयो रुग्णालयातील ‘रेडिओलॉजी’ विभागात एमआरआय यंत्र नव्हते. त्यावेळी रेडिओलॉजी विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता कायम राहावी म्हणून मेडिकलमधील यंत्र एमसीआयच्या पथकाला दाखवण्यात आले होते. आता मेडिकलचे एमआरआय बंद आहे. यामुळे आता मेडिकलमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता कायम राहावी यासाठी पुढे होणाऱ्या एमसीआयच्या निरीक्षण पथकाला मेयोतील मशीन दाखवणार का? असा सवाल येथील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना केला आहे.

मेडिकल असो की, मेयो या दोन्ही शैक्षणिक संस्था आहेत. येथे रेडिओलॉजीमध्ये एमडीच्या विद्यार्थ्यांना अद्यायावत ज्ञान मिळावे हा हेतू. मात्र, १८ महिन्यांपासून ‘एमआरआय यंत्र’ बंद आहे. दरवर्षी २० नवे एमडीचे विद्यार्थी मेडिकलच्या रेडिओलॉजी विभागात प्रवेश घेतात. दीड वर्षांपासून हे यंत्र बंद आहे. यामुळे ४० विद्यार्थ्यांना अद्याप एमआआरआय यंत्रावर काम करता आले नाही. नुकतेच निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’तर्फे वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री अमित देशमुख व संचालक डॉ. तात्यराव लहाने यांना निवेदन दिले. विशेष असे की, बुरशीच्या आजारावरील निदानासाठी एमआआरची खूप गरज आहे. हे यंत्र बंद असल्याने सीटी स्कॅनचा पर्याय सांगावा लागतो.
-डॉ. सजल बन्सल, अध्यक्ष मार्ड, मेडिकल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com