लसीकरणानंतर सिरिंज फेकल्या उघड्यावर, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

syringe
syringee sakal

नागपूर : कोरोनावर नियंत्रण (coronavirus) मिळवण्यासाठी मोठ्या तेजीने लसीकरण मोहीम (vaccination drive nagpur) सुरू आहे. मात्र, लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या सिरिंज अशाप्रकारे फेकण्यात येत आहे. हा प्रकार नरेंद्रनगर येथील लसीकरण केंद्रावर (narendranagar vaccination center) पुढे आला आहे. सिरिंज हे बायोवेस्ट अर्थात जैविक कचऱ्याच्या प्रकारात मोडत असल्याने शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर अशी सोय नसल्याचे उघडकीस आले. (no proper disposal of syringe after corona vaccination in nagpur)

syringe
अमरावती : वाहनातून साडेतीन कोटींची रक्कम पकडली, सहा जण ताब्यात

रुग्णालयातून बाहेर पडणारा हा कचरा आरोग्यासाठी घातक असल्याने त्याचे विघटन शास्त्रीय व्हावे, असा कायदा आहे. यामुळेच शहरातील सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये या बायोवेस्ट अर्थात जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट एकाच कंपनीला दिले आहे. मात्र, कोरोनाशी लढताना लसीकरणाची मोहीम राबवली जात असताना सिरिंजचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. दर दिवसाला पंधरा ते वीस हजारावर सिरिंजचा कचरा तयार होतो. एकद्यचा संसर्ग दुसऱ्याला होऊ नये म्हणून एकदा वापरलेली सिरिंज किंवा इंजेक्शन दुसऱ्याला देण्यात येत नाही. जैविक कचऱ्यात मोडत असल्याने शास्त्रीय पद्धतीनेच विल्हेवाट लावण्याची गरज आहे, मात्र नरेंद्रनगर येथील लसीकरण केंद्रावर अशाप्रकारे खर्ड्याच्या पेटीत अशाप्रकारे या सिरिंज टाकल्या जातात. एकप्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे.

लसीकरण केंद्रातील कचऱ्याचे नियोजन हवे -

रुग्णालयातून बाहेर पडणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नागपूरात नियोजन केले आहेत, त्याच धर्तीवर लसीकरण केंद्रावरील इंजेक्शन दिल्यानंतर फेकून देण्यात येणारी सिरिंजचा कचरा उचलण्यासाठी वर्गीकरणानुसारच कचरापेटीत टाकण्यात यावे, परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची टिका करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com