student_stress.jpeg
student_stress.jpeg

ना शिक्षक ना सुविधा परीक्षा होणार कशी? महाविद्यालये, विद्यार्थ्यांचे वाढले टेन्शन

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयस्तरावर परीक्षा घेण्याचे ठरवत सोमवारी परिपत्रक काढले. मात्र, विद्यापीठातील पाचशेपैकी तब्बल निम्म्या महाविद्यालयांमध्ये नियमित शिक्षक नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे दीडशेहून अधिक महाविद्यालयांमध्ये सोयी-सुविधाच नसल्याचे चित्र असताना, अशा परिस्थितीत महाविद्यालयस्तरावर परीक्षा होणार तरी कशी? असा प्रश्‍न आता निर्माण होत आहे. त्यामुळे महाविद्यालयस्तरावरील परीक्षेचे भविष्य काय? याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनामुळे राज्याने अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा घेण्याचे ठरविले. यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह अमरावती विद्यापीठाने महाविद्यालयस्तरावर परीक्षा घेण्याचे ठरविले. नागपूर विद्यापीठाचा विचार केल्यास 40 हून अधिक विभाग आणि तीन कंडक्‍टेड महाविद्यालये यांसह जवळपास पाचशेहून अधिक संलग्नित महाविद्यालये आहेत.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी 393 महाविद्यालये संलग्नित आहेत. विशेष म्हणजे दोन्ही विद्यापीठाच्या विभाग आणि कंडक्‍टेड महाविद्यालयात जवळपास 197 प्राध्यापकांची रिक्त पदे आहेत. यातूनच नागपूर विद्यापीठात 107 कंत्राटी प्राध्यापक आणि इतर विषय शिकविण्यासाठी तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. विद्यापीठांपेक्षा महाविद्यालयांची परिस्थिती तशी वेगळी नाही.
जवळपास अडीचशे महाविद्यालयात नियमित प्राचार्य नाहीत. याउपर 132 महाविद्यालयांमध्ये किमान एक शिक्षक नसल्याने त्यांचे संलग्नीकरण थांबविण्याची कारवाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे स्थानिक चौकशी समितीमार्फत 300 महाविद्यालयांच्या तपासणीत 151 महाविद्यालयांत मुबलक सोयी-सुविधा नसल्याचे आढळून आले. तेव्हा अशा परिस्थितीत महाविद्यालयस्तरावर परीक्षा होणार तरी कशी? या प्रश्‍न आहे. दुसरीकडे नियमित प्राध्यापक नसल्याने विषयाचे पेपर कोण काढणार? त्याचे मूल्यांकन कोण करणार? हा प्रश्‍न आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा उडणार फज्जा
शहरात असलेल्या बऱ्याच महाविद्यालयांमध्ये नियमित प्राध्यापकांसह सोयी-सुविधेची वानवा आहे. या महाविद्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून परीक्षा घेण्याचा विचार केल्यास या परीक्षा घेणे अशक्‍य आहे. ही परिस्थिती असल्यानेच विद्यापीठाद्वारे गेल्या वर्षी परीक्षा केंद्र कमी करण्यात आले होते हे विशेष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com