Nagpur : लस नाय तर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

collector office nagpur

नागपूर : लस नाय तर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाय

नागपूर - कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लस प्रभावी माध्यम असल्याने लसीकरणावर भर देण्यात येत आहे. लसीकरण न केल्यास पगार, लाभ थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून कार्यालयात प्रवेशासाठी लस बंधनकारक केली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी अकृषकच्या फायलीला संबंधित व्यक्तीने लस घेतल्यावर हात लावली तर निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी एका शिष्टमंडळाचे निवेदनच नाकारला. दोन दिवसात लस न घेणाऱ्या ३० वर लोकांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्या इशारा तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची पहिला व दुसरी लाट अतिशय भयंकर होती. अनेकांची जीव गेला. कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारकडून कठोर निर्बंध लादण्यात आले. त्यानंतरही या आजाराचा नायनाट पूर्णपणे करण्यास सध्यातरी यश आले नाही. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी सरकारकडून लसीकरणावर विशेष भर देण्यात येत आहे.

हेही वाचा: ‘खाण सुरू किंवा बंद होण्याशी काहीही संबंध नाही’

कोरोना लसीचे दोन्ही डोस न घेणाऱ्यांना पगार, शासकीय योजनांचा लाभ नाकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी काढले. त्याच प्रमाणे शासकीय कार्यालयात कामाकरता येणाऱ्यांसाठीही दोन्ही डोस बंधनकारक केलेत. लसीकरण न करणाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे.

मंगळवारला जवळपास ७० लोकांना विविध कामासाठी भेट दिली. यातील ५ लोकांना लस न घेतल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारण्यात आला. आज बुधवारला जवळपास १०० लोकांना भेट दिली. यातील २५ लोकांना प्रवेश नाकारण्यात आला. यात एक पक्षाच्या शिष्टमंडळाचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक राजकीय पक्षाचे शिष्टमंडळ निवेदन घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्याकडे आले. येतात त्यांनी लसीकरणाबाबत विचारणा केली.

शिष्टमंडळातील प्रमुखांनी लसीकरण न केल्याचे उत्तर दिले. ज्या लोकांचे लसीकरण झाले, त्यांनी निवेदन देण्याच्या सूचना त्यांनी केली. परंतु एकाही व्यक्तीचे लसीकरण झाले नसल्याचे उत्तर देण्यात आले. त्यावर त्यांना बाहेर जाण्याचा सल्ला देण्यात आला. जिल्हाधिकारी विमला आर. यांच्याकडे अकृषकच्या संबंधातील प्रकरणे काही व्यक्ती घेऊन आले. त्यांना लसीकरणबाबत विचारणा करण्यात आली. त्यांनी लसीकरण झाले नसल्याचे उत्तर दिल्याने बाहेर जाण्याचा सल्ला दिला. त्या व्यक्तींनी लसीकरण केल्यावर त्यांच्या फाईल जिल्हाधिकारी यांनी हाताळल्या.

loading image
go to top