नागपूर - शहरातील सर्व प्रकारच्या वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः प्रेशर हॉर्न, कटआऊट हॉर्न आणि मॉडिफाइड सायलेंसरमधून येणारा कानठळ्या बसवणारा आवाज नागपूरकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे..तज्ज्ञांच्या मते, अशा तीव्र ध्वनीमुळे चिडचिडेपणा, मानसिक थकवा, एकाग्रता कमी होणे, रक्तदाब वाढणे, इतकेच नव्हे तर बहिरेपणाचे प्रमाणही वाढत आहे. सोबतच अचानक असे वाहनांचे फटाके वाजल्याने दचकून इतर वाहनचालकांना अपघात होण्याचा धोका असतो.पण उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वर्गातील युवक बुलेट सारख्या वाहनांचा उपयोग करीत आहेत. पण सामान्य वर्गातील वाहनचालकांवर कारवाईत पुढे असणारे वाहतूक पोलिस त्या उच्चभ्रू, शौकिन वाहनचालकांना अभय देत असल्याचे चित्र आहे..गेल्या काही वर्षांत कानाच्या समस्या आणि ‘नॉइज इंड्यूस्ड हिअरिंग लॉस’ म्हणजेच आवाजामुळे होणारे बहिरेपणाचे रुग्ण लक्षणीयरीत्या वाढले आहे, असे तज्ज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेषतः ऑटो-टॅक्सी, बस, ट्रक आणि बाईक यामध्ये वापरल्या जाणाऱ्या अवैध हॉर्नचा आवाज ९० ते १३० डेसिबल्सपर्यंत जातो. जो मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार, ८५ डेसिबल्सपेक्षा जास्त आवाज सतत ऐकला तर कानांचे नुकसान होते..शहरातील रस्त्यांवरून ये -जा करताना अनावश्यक हॉर्न वाजवत भरधाव दुचाकी, चारचाकी वाहने दामटली जातात. विशेषतः यात तरुण दुचाकीचालकांचे प्रमाण जास्त आहे. तर ट्रकसह चारचाकी वाहनांचे हॉर्न जादा डेसिबलचे असतात. त्यांची मर्यादा ९३ ते ११२ पर्यंत आहे. मात्र, विशेषतः ट्रकचालक अनावश्यक खूप वेळ हॉर्न वाजवताना आढळतात.या कर्णकर्कश हॉर्नमुळे लोकांत चिडचिडेपणा वाढतो. रस्त्यावर अचानक वाजविल्या जाणाऱ्या हॉर्नमुळे अन्य वाहनधारक विचलित होतात. यातून अपघात घडण्याचा धोकाही संभवतो. कारण बाजूने जोरात हॉर्न वाजवित वाहन गेल्यास वाहनधारक विचलित होऊन त्याचा गाडीवरील ताबा सुटू शकतो..चिडचिडेपणासह वाढतात कानाचे आजारहॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामुळे मेंदूला त्रास झाल्याने चिडचिडेपणा वाढतो. आपल्या कामाचे नियोजन करून घराबाहेर पडलेला वाहनधारकाला कामाच्या ठिकाणी पोचल्यावर मन एकाग्र होण्यास वेळ लागतो. परिणामी तो सहकारी, कुटुंबीयांवर चिडचिड करतो. कर्णकर्कश हॉर्नसह सायलेन्सरमध्ये बदल करून भरधाव वाहने हाकली जातात.शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर हे चित्र नेहमीचेच आहे. त्यामुळे वाढत्या वायू प्रदूषणाच्या यादीत असलेल्या शहरातील ध्वनिप्रदूषणातही भर पडत आहे. शिवाय वाहनधारक व नागरिक बहिरेपणाला बळी पडत आहेत. बहिरेपणाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे..घटना दररोज, मात्र कारवाई थातूरमातूररस्त्यावर वाहतूक पोलिसांनी दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून आवाज करत गाडी हाकणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र, अशा घटना नित्याच्याच बनल्या असताना वाहतूक पोलिस त्याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाहीत. अशा कारवाया सातत्याने होणे आवश्यक आहे. गाड्यांच्या कर्णकर्कश आवाजावर नियंत्रण यायलच हवे..तज्ज्ञ आणि नागरिक काय सुचवतात?प्रेशर हॉर्नवर कडक दंडध्वनिप्रदूषण मापक यंत्रे वाढवणेरुग्णालये, शाळा परिसर ‘हॉर्न-फ्री झोन’ घोषित करणेवाहन तपासणी वेळोवेळी करणेतरुणांमध्ये ‘राइड विथ नो हॉर्न’ मोहीम राबवणेनागरिकांनी जनजागृतीत सहभागी करून घेणे .ध्वनी प्रदूषणाचा आरोग्यावर परिणामध्वनी प्रदूषणाला अनेकदा गंभीरतेने घेत नाही. कारण ते दिसत नाही. पण अत्यंत जीवघेणे आहे. आज जगातील जवळपास अर्धी लोकसंख्या ध्वनी प्रदूषणाने प्रभावित आहे. युरोपीय देशांमध्ये झालेल्या संशोधनातून आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालांतून या समस्येची भीषणता स्पष्ट होते.जास्त आवाजाच्या सतत संपर्कामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक त्रास निर्माण होतात. दीर्घकाळ मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्यास न्युरोसिस, नर्वस ब्रेकडाऊन असे आजार होऊ शकतात. टीन्निटस – कानात सतत आवाज येत राहण्याचा त्रास; हा रोग वाढत असून अत्यंत त्रासदायक आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.