उपराजधानीवर पाणीटंचाईचे संकट? पाणीपुरवठा करणारे प्रकल्प कोरडे

totladoh
totladohe sakal
Updated on

नागपूर : २०१९ या वर्षी शहराला पाणीटंचाईच्या (water scarcity nagpur) संकटाचा सामना करावा लागला होता. अर्धा पावसाळा संपला तरीही दमदार पाऊस झाला नाही. जुलै आणि ऑगस्ट पावसाचे महिने मानले जातात. ऑगस्टही अर्धा संपत आला तरी वरुणराजा रुसलेलाच आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास येणाऱ्या उन्हाळ्यात शहराला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. कारण, नागपूरला पाणीपुरवठा करणारी धरणे (nagpur dam water level) जवळपास कोरडी आहेत.

totladoh
RTE मध्ये ३७०० कोटींचा घोटाळ्याचा आरोप, शाळा व्यवस्थापनाची 'HC'त धाव

भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरी पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, आतापर्यंत तरी वरुणराजाने निराशाच केली आहे. पावसाची आता केवळ दोन नक्षत्रे व दीड महिना शिल्लक आहे. या कालावधीत दमदार पाऊस कोसळला तरच धरणे काठोकाठ भरणार आहेत. विदर्भातील विविध मोठ्या, मध्यम व छोट्या धरणांमधील उपलब्ध जलसाठ्यांचा विचार केल्यास, परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. सद्यःस्थितीत नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ५०.२१ टक्के पाणी शिल्लक आहे. गतवर्षी याचवेळी जलसाठा ६६.६८ दशलक्ष घनमीटर होता. मध्यम प्रकल्पांमध्येही गतवर्षीपेक्षा (४१.९३ दशलक्ष घनमीटर) फक्त १९.८६ टक्के इतकाच साठा उपलब्ध आहे. लघु (छोट्या) प्रकल्पांचीही स्थिती फारशी उत्साहवर्धक नाही. आजच्या तारखेला छोट्या प्रकल्पांमध्ये केवळ १५.६६ टक्केच जलसाठा आहे, जो गतवर्षी ३८.३१ दशलक्ष घनमीटरपेक्षा खूपच कमी आहे.

नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचीही स्थिती चिंताजनक आहे. पेंच नदीवरील तोतलाडोह व कामठी खैरी येथे अनुक्रमे ६४.७७ व ४३.१२ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न आल्यास यंदाचा उन्हाळा कसा निघेल, असा प्रश्न उपस्थित होणार आहे. जिल्ह्यातील खिंडसी, वडगाव व नांद या धरणांमध्ये मात्र सध्या बऱ्यापैकी जलसाठा उपलब्ध आहे. नागपूर विभागाच्या तुलनेत अमरावती विभागातील धरणांची स्थिती थोडी समाधानकारक आहे.

सहा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस -

विदर्भातील आतापर्यंतच्या पावसाचा विचार केल्यास, अकरापैकी तब्बल सहा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. सर्वात कमी पावसाची नोंद अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यांत करण्यात आली आहे. येथे सरासरीच्या अनुक्रमे ३० व २९ टक्के कमी पाऊस झाला असून, त्याखालोखाल गोंदिया येथे उणे २१ टक्के, अकोला येथे उणे २० टक्के, गडचिरोली येथे उणे १९ टक्के आणि वर्धा येथे उणे १४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. चंद्रपूर, वाशीम, नागपूर, यवतमाळ आणि भंडारा या पाच जिल्ह्यांनीच काठावर सरासरी गाठली आहे.

धरणातील जलसाठ्यांची स्थिती (दशलक्ष घनमीटरमध्ये)

धरण आजचा साठा गतवर्षीची स्थिती

  • तोतलाडोह ६४.७७ ९२.५

  • खिंडसी ३५.०४ ३१.३९

  • कामठी खैरी ४३.१२ ९६.१

  • इटियाडोह ३०.९५ ५०.४

  • पुजारीटोला ५१.४३ ५२.७८

  • दिना ३८.८१ ४६.४८

  • आसोलामेंढा ८८.९३ १००

  • गोसेखूर्द ४७.४३ ५४.२

  • बावनथडी ३६.५६ ४६.७६

  • बेंबळा ७०.२ ८३.४५

  • खडकपूर्णा १५.०७ ७६.४३

  • अप्पर वर्धा ६०.१२ ८९.७७

  • काटेपूर्णा ८१.०८ ९०.०८

  • लोअर वर्धा ७१.०८ ७३.७१

  • बोर ४०.३९ ७२.५७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com