
मुंबई : रेल्वे तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास आता संपणार आहे. रेल्वे प्रशासनाने ऐतिहासिक पाऊल उचलत प्रवासादरम्यानच तिकीट तपासनीसाकडून (टीटीई) थेट जनरल तिकीट मिळण्याची सुविधा लवकरच देशभर उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर याचा पहिला प्रयोग करण्यात आला, तो यशस्वी ठरला आहे.