esakal | आता धावत्या मेट्रोत साजरा करा समारंभ; अवघ्या तीन हजार रुपयांत होणार ‘ग्रॅन्ड सेलिब्रेशन' 
sakal

बोलून बातमी शोधा

Now celebrate your special moments in Running Nagpur Metro

महामेट्रोने ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स' अनोखी योजना सुरू केली. केवळ तीन हजार रुपयांमध्ये वाढदिवस, प्री-व्हेंडिंग शूट, लग्नाचा वाढदिवस व इतर कार्यक्रम धावत्या मेट्रोत साजरा करता येणार आहे.

आता धावत्या मेट्रोत साजरा करा समारंभ; अवघ्या तीन हजार रुपयांत होणार ‘ग्रॅन्ड सेलिब्रेशन' 

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर ः शहरातील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामेट्रो विविध उपक्रम सुरू करीत आहे. यात आता महामेट्रोने नागरिकांना वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस धावत्या मेट्रोतून साजरा करण्याची सोयही उपलब्ध करून दिली. केवळ तीन हजार रुपयांत नागरिकांना समारंभ अविस्मरणीय करता येणार आहे.

महामेट्रोने ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स' अनोखी योजना सुरू केली. केवळ तीन हजार रुपयांमध्ये वाढदिवस, प्री-व्हेंडिंग शूट, लग्नाचा वाढदिवस व इतर कार्यक्रम धावत्या मेट्रोत साजरा करता येणार आहे. महामेट्रोच्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेकांनी मेट्रोची बुकींगही केली. 

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

ही योजना सर्वांकरिता खुली असून नागरिकांप्रमाणे इव्हेंट कंपन्याही याचा लाभ घेऊ शकतात. ३ कोचच्या मेट्रोमध्ये कोरोना पार्श्वभूमीमुळे जास्तीत जास्त १५० व्यक्तींना आमंत्रित करता येईल. नागरिकांना एका तासासाठी तीन हजार मोजावे लागतील. यापेक्षा अतिरिक्त वेळ लागल्यास नागरिकांना प्रती तास दोन हजार रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. नागरिकांच्या या पैशातून समारंभासाठी मेट्रो कोचला आकर्षक पद्धतीने सजविण्यात येईल. 

याशिवाय नागरिकांच्या समारंभात मेट्रोतर्फे ‘वेलकम अनाउन्समेंट' करण्यात येणार आहे. मेट्रोतर्फे समारंभादरम्यान कर्मचारीही पुरविण्यात येईल. याशिवाय फोटो, व्हीडीओग्राफीलाही मुभा राहणार आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी ७ दिवसांपूर्वी मेट्रोची बुकिंग मेट्रो भवन येथे करावी लागणार आहे. 

मेट्रो ट्रेनमध्ये वाढदिवस साजरा करणारे आलोक वर्मा यांनी हा एक वेगळा अनुभव असल्याचे नमूद केले. प्रथमच वाढदिवसाचा क्षण अविस्मरणीय झाल्याचे नमूद करीत माफक शुल्कामुळे साधारण व्यक्तीही लाभ घेऊ शकतो, असे ते म्हणाले. श्रीपाद देशपांडे यांनीही कार्यक्रमात सहभागी नागरिकांनीही आनंद घेतल्याचे ते म्हणाले.

क्लिक करा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

मेट्रोत सायकललाही प्रवेश

दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू असून नागरिकांना सोबत आणलेली सायकलही मेट्रोतून नेता येणार आहे. मेट्रोतून सायकल नेल्यास नागरिकांना हवे त्या स्टेशनवरून गंतव्य ठिकाणी पोहोचता येणार आहे. आज काही मेट्रो प्रवाशांनी सुभाषनगर मेट्रो स्टेशन येथून लोकमान्यनगर स्टेशन दरम्यान सायकल सोबत बाळगून मेट्रोने प्रवास केला.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top