esakal | आता ना थांबत श्वास, ना चुकत काळजाचा ठोका; कुठं हरवलाय 'तो' थरार?
sakal

बोलून बातमी शोधा

nowadays circus is disappear nagpur news

पटवर्धन मैदानावर रंगत असलेल्या सर्कशीत अफलातून करामती पहायला मिळत होत्या. विविध राज्यातील, नव्हेतर विदेशातील कलाकारांचा ताफा ज्या कसरती सादर करत त्या पाहून ओठावर आपोआपाच हॅटस ऑफ हे दोन शब्द येत होते.

आता ना थांबत श्वास, ना चुकत काळजाचा ठोका; कुठं हरवलाय 'तो' थरार?

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : झगमगत्या प्रकाशात नजर खिळवणा‍ऱ्या, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या, हृदयाचा ठोका चुकेल अशा करामती करीत मनोरंजन करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. साहसी खेळात वेळी चुकली की जीव जाण्याची भीती, मात्र अचूक वेळेसाठी सरावातून कौशल्य कमवत असत. अचूक वेळेला सलाम करावासा वाटतो. परंतु, ही सारी सर्कशीतील कसरत पोटासाठी. दरवर्षी उपराजधीत पटवर्धन शाळेच्या मैदानावर महिनाभर सर्कशीचे खेळ चालत होते. हिवाळ्याची चाहूल लागली की, बच्चेकंपनीसह मोठ्यांना सर्कसची प्रतिक्षा असे. आता मात्र सर्कसचे खेळ हरवले आहेत. सर्कससाठी आवश्यक असलेली मैदाने शिल्लक नाहीत. 

हेही वाचा - मन सुन्न करणारी घटना : आई-वडिलांनी टोकाच्या निर्णयात मुलीलाही घेतले सोबत; जड मनाने घेतली नदीत उडी

पटवर्धन मैदानावर रंगत असलेल्या सर्कशीत अफलातून करामती पहायला मिळत होत्या. विविध राज्यातील, नव्हेतर विदेशातील कलाकारांचा ताफा ज्या कसरती सादर करत त्या पाहून ओठावर आपोआपाच हॅटस ऑफ हे दोन शब्द येत होते. उपराजधानीत पहिली सर्कस उभारणारे सर्कसमॅन चंद्रकांत गाडगे यांचे सुपूत्र नीरज गाडगे यांनी त्या आठवणींना उजाळा दिला. नागपुरात पहिली सर्कस अमर सर्कस. या सर्कशीतील दोरीवरचा डान्स शो हिंदी सिनेमातील गाण्याच्या ‌ऱ्हिदमवर रंगत असे. डान्स करताना त्या मुली जो तोल सांभाळत होत्या, त्याला तोड नव्हती. टाळ्या आणि शिट्ट्यांची दाद त्यांना मिळत होती. कधी हातात रिंग घेऊन तर कधी रिबन घेऊन तोल सांभाळण्याचा अनुभव प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरत असे. भारतात सर्कसचे जनक विष्णूपंत छत्रे होते. २६ नोव्हेंबर १८८२ मध्ये 'ग्रँड इंडियन सर्कस'चा पहिला शो मुंबईत सादर केला. मात्र, नागपुरात न्यू अमर सर्कसचे जनक चंद्रकांत गाडगे. पूर्वी शंभरपेक्षा सर्कस कंपनी होत्या. अलीकडे दहा ते पंधरा सर्कस कंपनी आहेत. सर्कसच्या तंबूत सांस्कृतिक एकात्मता जोपासली जात होती. मणिपुरी, आसाम, बंगाल, नागालॅन्डसह देशभरातील कलाकार एका तंबूत असत. त्यांचे स्टंट आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत होते. धारदार सुऱ्यांवर उघड्या अंगाने झोपून हे कलाकार करामती करत असत. पाठ, छाती आणि गळ्यावर सुरीचे टोक आणून अधांतरी झोपण्याची करामत पाहताना प्रेक्षकांचा श्वास थांबत असे. 'मौत का कुआँ' या खेळात दुचाकी वाहन फिरवत चित्तथरारक करामतीचे दृश्य बघताना प्रेक्षकांचा प्राण कंठाशी येत होता. वाघ सिंहांना नियंत्रणात ठेवणारा रिंग मास्टर असो की, लहान मुलांचा रिंग शोला प्रेक्षक टाळ्या वाजवून दाद देत होते. सर्वोच्च न्यायालयाने प्राणी आणि पक्षांच्या करामतींवर बंदी आणली आणि सर्कसचे खेळ कमी झाले. 

हेही वाचा - वाराणसीमधून निवडणूक लढवून जिंकून दाखवू, 'या' खासदाराचे थेट मोदींना आव्हान

हसरे विदूषक झाले दिसेनासे - 
हातवाऱ्यांपासून तर शारीरिक हालचालींतून सर्कसमध्ये शाब्दिक कोट्या वापरून विडंबन करणारे पात्र म्हणजे विदूषक. पोटासाठी खेळ करताना ते पोटातील भूक विसरून प्रेक्षकांना हसवत होते. बुटक्या विदुषकांमध्ये असलेलं शारीरिक व्यंग हेच प्रेक्षकांचे मनोरंजनाचे साधन होते. सर्कसमधील खरे नायक होते विदूषक. कॉमेडी पंच मारत हसवणारे विदूषक आज नाहीत. 

वडील चंद्रकांत गाडगे यांनी १९६७ मध्ये दिल्लीत अमर सर्कसचा शो सादर केला होता. कारगीलमध्ये भारतीय सैनिकांनी तंबू आणि लाइट युद्ध प्रसंगासाठी घेऊन गेले होते. नागपुरात १९६९-७० मध्ये पहिल्यांदा सर्कस पटवर्धन मैदानात खेळ रंगला होता. पन्नास वर्षे सर्कस जोमात होती. सध्या केरळात जमुना तर मुंबईत रॅम्बो सर्कसचे खेळ होत असल्याचे ऐकिवात आहे. सर्कशीप्रमाणे नागपुरातील मैदाने संपली. सर्कस आयुष्यातून हरवली आहे, हे मात्र नक्की. 
- नीरज चंद्रकांत गाडगे, चित्रपट निर्माता, नागपूर.