परीक्षांचे निकाल लागेना; नागपूरमध्ये NSUI च महिला कुलगुरूंच्या कक्षाबाहेर बाहुली लावून आंदोलन

NSUI Protest at Nagpur University : आंदोलकांनी चक्क कुलगुरूंच्या कक्षाबाहेर असलेल्या नावाच्या पाटीला बाहुली लावून निषेध व्यक्त केला. तसेच कुलगुरू ‘कठपुतळी’ असल्याचा आरोपही करण्यात आला.
NSUI Protest at Nagpur University

NSUI Protest at Nagpur University

esakal

Updated on

नागपूर, ता. ६ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून गेल्या तीन महिन्यांपासून निकाल जाहीर करण्यात दिरंगाई होत असल्याने त्याविरोधात एनएसयूआयने शुक्रवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी चक्क कुलगुरूंच्या कक्षाबाहेर असलेल्या नावाच्या पाटीला बाहुली लावून निषेध व्यक्त केला. तसेच कुलगुरू ‘कठपुतळी’ असल्याचा आरोपही करण्यात आला. या आंदोलनामुळे विद्यापीठात वादाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com