Amravati Chemist Murder Case: सातही आरोपींचा ताबा एनआयए घेणार

कोल्हे हत्याप्रकरणी पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांची माहिती
Sandeep Bharambe writes umesh kolhe murder amravati nupur sharma case bjp amit shah
Sandeep Bharambe writes umesh kolhe murder amravati nupur sharma case bjp amit shah sakal

अमरावती : बहुचर्चित उमेश कोल्हे हत्याप्रकरणाचा तपास आता केंद्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयए) करणार असल्याने प्रकरणाशी संबंधित संपूर्ण कागदपत्रे तसेच अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींचा ताबा एनआयए घेणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी आज दिली. (Amravati Chemist Murder Case)

पोलिस आयुक्तांनी सांगितले की, एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज सकाळीच आपल्याशी याबाबत चर्चा केली असून स्थानिक न्यायालयात संशयित आरोपींचा ताबा घेण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली आहे. मंगळवारी याप्रकरणाशी संबंधित संशयित आरोपी व दस्तावेज एनआयएकडून ताब्यात घेतले जाणार आहेत. दरम्यान, या हत्या प्रकरणातील आठवा आरोपीसुद्धा गवसला असून त्याच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणाचे तार आंतरराष्ट्रीय कट्टरपंथी संघटनांशी आहे किंवा नाही हे आता एनआयएच्या तपासातूनच समोर येणार आहे. सुरवातीपासूनच अमरावती पोलिसांनी गांभीर्यपूर्वक याप्रकरणाचा तपास सुरू केला होता. जसजसे पुरावे मिळत गेले त्यादृष्टीने तपास होत गेला.

म्हणूनच सुरवातीला केवळ दोन संशयित आरोपी अटक करण्यात यश आल्यानंतर आम्ही आणखी मुळाशी गेलो आणि सात आरोपींपर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे पोलिसांनी दबावात येऊन किंवा बेजबाबदारपणे याप्रकरणाचा तपास केला, असे आरोप चुकीचे असल्याचे त्या म्हणाल्या.

तिघांना धमक्या

नूपुर शर्मा यांची वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी शहरातील तीन लोकांना धमक्या मिळाल्याची माहिती आहे. त्यापैकी एका व्यक्तीने आम्हाला लेखी माहिती दिली आहे. मात्र, अन्य दोघांनी कुठलेही ‘स्टेटमेन्ट’ देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांचे मन वळविण्याचे आम्ही प्रयत्न करीत असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले.

‘त्यांनी’ एफआयआर वाचावा

या प्रकरणात कुठेही हा प्रकार खून लूटमार किंवा चोरीचा असल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. आरोप करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी एफआयआर वाचला नसावा, मागील काही काळातील दाखल गुन्ह्यांमुळे आपल्यावर काही मंडळी राजकीय आरोप करीत असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com