

Nylon Manja
sakal
नागपूर : नायलाॅन मांजावर तबब्ल दहा वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. शासन-प्रशासनाच्या एका दशकाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही बंदी कुचकामी ठरली. त्यामुळे गेल्या १५ वर्षांत राज्यात नायलॉन मांजामुळे १८२ तर, नागपुरात ३८ जणांचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे यात लहान मुलांपासून प्राैढांचाही समावेश आहे.