Nylon Manja
sakal
नागपूर - संक्रांतीदरम्यान शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे घडलेल्या घटनांमध्ये एकूण ३६ जण जखमी झाले आहेत. यापैकी १९ जखमींवर इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात (मेयो), १६ जणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) तर एका जखमीवर लता मंगेशकर रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती न्यायालय मित्र अॅड. निश्चय जाधव यांनी शपथपत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे.