राज्य सरकारला धक्का : मराठा पाठोपाठ ओबीसी आरक्षण रद्द; याचिका फेटाळल्या

राज्य सरकारला धक्का : मराठा पाठोपाठ ओबीसी आरक्षण रद्द; याचिका फेटाळल्या
Updated on

नागपूर : नागपूरसह राज्यातील सहा जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील रद्द करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सर्वच पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या (The appeal was dismissed by the Supreme Court) आहेत. राज्य सरकारला हा मोठा धक्का (Big shock to the state government) मानला जात आहे. मराठा पाठोपाठ ओबीसी आरक्षण रद्द (OBC reservation canceled following Maratha) झाल्याने सरकारचे चांगलीच अडचण होणार आहे. (OBC reservation canceled following Maratha; Petition rejected)

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील आरक्षण ५० टक्क्यांवर असल्याने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च रोजी ओबीसींचे आरक्षण रद्द करीत सर्व जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निकाल दिला होता. राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी वर्गातील सदस्यांचे सदस्यत्व रद्द करीत निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली होती. या सर्व जागा आता खुल्या गटात वर्ग करण्यात आल्यात. यात नागपूर, अकोला, वाशीम, धुळे, नंदूरबार आणि पालघर या जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा समावेश आहे.

राज्य सरकारला धक्का : मराठा पाठोपाठ ओबीसी आरक्षण रद्द; याचिका फेटाळल्या
महिला दुकानदारावर बलात्कार; नागपुरातील जरीपटक्यातील घटना

नागपुरातील ओबीसी प्रवर्गातील १६ सदस्यांच्या जागा रद्द करण्यात आल्यात. राज्य सरकारसह नागपूर व विविध जिल्हा परिषदांमधील सदस्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली. या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित निकाल देताना या सर्वच याचिका फेटाळून लावल्या. तसेच ४ मार्च रोजीच्या आदेशावर स्थगनादेश देण्याची विनंतीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्या. ए. एम. खानवीलकर, न्या. नागेश्वर राव आणि न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

दोन याचिका प्रलंबित

जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी तीन याचिका दाखल केल्या होत्या. यात पुनर्विचार, मॉडीफिकेशन ऑफ ऑर्डर (आदेशातील सुधारणा) तसेच रिट पिटिशनचा समावेश होता. पुनर्विचार याचिका खारिज केली असली दोन याचिका प्रलंबित असल्याचे माजी सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांनी सांगितले.

राज्य सरकारला धक्का : मराठा पाठोपाठ ओबीसी आरक्षण रद्द; याचिका फेटाळल्या
मतभेद दूर करण्यासाठी नेत्यांची मधस्थी; महाविकासआघाडीची रविवारी बैठक
न्यायालयाने ओबीसींची जनगणना करण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता सरकारने आरक्षण टिकविण्यासाठी ओबीसींची जनगणना करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
- सचिन राजूरकर, महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ

(OBC reservation canceled following Maratha; Petition rejected)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com