
नागपूर :मराठा समाजाचा ओबीसी समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईत बेमुदत उपोषणाला बसले आहेत. सरकार दबावात येऊन निर्णय घेण्याची भीती ओबीसी समाजाला असल्याने त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी नागपुरातील संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात शनिवारपासून साखळी उपोषण सुरू केले. ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास आम्हीही मुंबईत धडक देऊ असा इशारा माध्यमांशी बोलताना बबनराव तायवाडे यांनी दिला.