Girl's Molestation : संबंधाबाबत पतीला सांगून तुझ्या संसार तोडणार; विवाहितेला धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 crime

संबंधाबाबत पतीला सांगून तुझ्या संसार तोडणार; विवाहितेला धमकी

नागपूर : एका ११ वर्षीय मुलीसह दोघींशी अश्‍लील चाळे केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी तक्रारीवरून सक्करदरा आणि कळमना पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय विवाहितेचे माहेर सक्करदरा परिसरात आहे. तिचे लग्नापूर्वी मिथुन पाटील (२७) याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. मिथुन कॅटरिंगच्या व्यावसायिकाकडे कामाला जातो. दोघांच्या मैत्रीची वस्तीत चर्चा होती. गेल्या उन्हाळ्यात युवतीचे लग्न झाले. तेव्हापासून मिथुन तिला त्रस्त करीत होता.

हेही वाचा: नग्न फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवर अत्याचार

‘आपल्या संबंधाबाबत तुझ्या पतीला सांगून संसार तोडणार’, अशी वारंवार धमकी देत होता. त्यामुळे ती घाबरून त्याला भेटत होती. परंतु, काही दिवसांनंतर त्याला तिने भेटण्यास नकार दिला. त्यामुळे मिथुन चिडून तिचा पाठलाग करणे, मोबाईलवर अश्‍लील मेसेज करणे आणि तिचा पाठलाग करीत होता. २१ नोव्हेंबरला मिथुन युवतीचा पाठलाग करीत लगट करताना पतीला दिसला. त्यानंतर युवतीने पतीला सर्व हकिकत सांगून सक्करदरा पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी तक्रारीवरून मिथुनवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

बॅंक एजंटला झोडपले

कळमना परिसरात मावशीकडे शिक्षणासाठी राहणारी ११ वर्षीय मुलगी किचनमध्ये काम करीत होती. त्यावेळी राजू मंगलराम मानकर (४८) हा रविवारी घरी आला. तो बॅंकेसाठी डेली कलेक्शन एजंट म्हणून काम करतो. त्याने घरात कुणीही नसल्याचे बघितले. त्याची ११ वर्षीय मुलीवर नजर फिरली. त्याने किचनमध्ये घुसून अश्‍लील चाळे केले. मुलीने आरडाओरड केली. त्यामुळे शेजाऱ्यांनी धाव घेतली. मुलीने घडलेला प्रकार सांगताच शेजाऱ्यांनी राजूची चांगली धुलाई केली. पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल करून बोलावले. कळमना पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून राजूला अटक केली.

loading image
go to top