नग्न फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; उच्चशिक्षित तरुणीवर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

atyachar

नग्न फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवर अत्याचार

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : पिझ्झा कंपनीत नोकरीवर असलेल्या ३३ वर्षीय तरुणीकडून पैसे तर लुटलेच पण अत्याचारही केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय तरुणी रिया (काल्पनिक नाव) हिची ८ मे २०१५ मध्ये साहील हुसैन अब्दूल अजीज हुसैन (३०, रा. संतोषीनगर, रायपूर-छत्तीसगढ) याच्याशी फेसबुकवरून ओळख झाली. साहील हा रियाच्या फोटोंना लाइक करीत होता. त्यानंतर त्याने रियाला मॅसेंजरवरून मॅसेज केला. दोघांची फेसबुकवरून चॅटिंग सुरू झाली. दोघांची काही दिवसांतच मैत्री झाली.

हेही वाचा: गडकरींची स्तुती तर फडणवीसांना टोला; निषेध रॅलीने वातावरण खराब

दोघांनी एकमेकांचे व्हॉट्सॲप क्रमांक घेतले आणि मग ‘फोन अ फ्रेंडशिप’ सुरू झाली. दोघेही अविवाहित असल्यामुळे त्यांची मैत्री प्रेमात बदलली. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रिया ही पिझ्झा कंपनीत नोकरीला असल्यामुळे तिची आर्थिक स्थिती चांगली होती. त्याचाच गैरफायदा साहीलने घेतला. त्याने रियाला पैशासाठीच प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

साहील तिला भेटायला छत्तीसगडवरून येण्यास तयार झाला. २०१५ मध्ये तो नागपुरात आला आणि गणेशपेठ बस स्थानकाजवळील हॉटेलमध्ये थांबला. रियाला हॉटेलमध्ये मुक्कामासाठी बोलावून घेतले. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. परंतु, तिने नकार दिला. साहीलने तिला लग्न करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. शारीरिक संबंध प्रस्थापित करताना त्याने मोबाईलने तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले.

हेही वाचा: शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना हाणला टोला; म्हणाले...

१५ लाख रुपये हडपले

लवकरच लग्न करणार असल्याचे सांगून रियाला त्याने घर बांधण्यासाठी पैशाची मागणी केली. रियानेही त्याला लगेच क्रेडिट कार्डवर लोन घेऊन ५ लाख रुपये दिले. त्यानंतर वेगवेगळे कारण सांगून त्याने रियाकडून १५ लाख रुपये उकळले. तिने पैसे देण्यास नकार देताच तो धमकी देऊ लागला. त्यामुळे रियाने गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

२०१५ पासून तो वारंवार नागपुरात यायला लागला. त्याची सर्व व्यवस्था रियाला करायला लावत होता. पाच वर्षांपासून तो वारंवार रियाचे लैंगिक शोषण करीत होता. परंतु, रियाने लग्नाचा विषय काढताच तो टाळाटाळ करीत होता. रियाने लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे त्याने तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

loading image
go to top