esakal | चिमुकल्यांच्या आहारात नाही 'तेल', आहार तयार करायचा कसा?
sakal

बोलून बातमी शोधा

पोषण आहार

चिमुकल्यांच्या आहारात नाही 'तेल', आहार तयार करायचा कसा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना तसेच गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना अंगणवाडीतून पोषण आहार (nutritious food) देण्यात येतो. या आहारातून तेल कमी करून साखर दिली जात आहे. तेलाअभावी पोषण आहार कसा तयार करायचा? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. (oil not include in nutritious food of child in nagpur)

हेही वाचा: यवतमाळ : कळंबच्या कन्येला विठ्ठल पूजेत सहभागी होण्याचा मान

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण, आदिवासी व नागरी भागातील सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालक, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता पोषण आहार पॅकिंग करून दिला जातो. कुपोषण करण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था सुरू करण्यात आली. सध्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहारात सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना चवळी अथवा चना प्रतिदिन प्रतिलाभार्थी ३० ग्रॅम, मूगडाळ अथवा मसूरडाळ २० ग्रॅम, गहू ८० ग्रॅम, मिरची पावडर चार ग्रॅम, हळदी पावडर चार ग्रॅम, मीठ आठ ग्रॅम व साखर २० ग्रॅम असा एकूण १६६ ग्रॅम वजनाचा आहार प्रतिदिन द्यायचा आहे. तर गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना चवळी अथवा चना प्रतिदिन प्रतिलाभार्थी ४० ग्रॅम, मूगडाळ अथवा मसूरडाळ ३१.५ ग्रॅम, गहू ८८ ग्रॅम, मिरची पावडर चार ग्रॅम, हळदी पावडर चार ग्रॅम, मीठ आठ ग्रॅम, साखर २० ग्रॅम असा दररोज १९५.५ ग्रॅम पूरक पोषण आहार पॅकिंग करून द्यावयाचा आहे. मात्र, आता तेलाऐवजी साखर देण्यात येत आहे.

तेलाचे भाव हे साखरेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कंत्राटदाराने त्याचा पुरवठा कमी करून साखर दिली. भाव निम्म्यावर आल्यास अर्धा किलो तेलाच्या बदल्यात एक किलोचा पुरवठा कंत्राटदार देणार आहे. तसे होणार नाही. सत्ताधाऱ्यांचे याकडे लक्ष नाही. सत्ताधारी कंत्राटदाराचे हित जोपासत आहे.
-व्यंकट कारेमोरे, उपगटनेते, भाजप, जि.प.
loading image