

Residents of Old Mangalwari raise concerns over contaminated water supply
Sakal
नागपूर : जुनी मंगळवारी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून नळाव्दारे दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी वारंवार ओसीडब्ल्यूकडे तक्रार करूनही समस्या मार्गी लागलेली नसल्याचा आरोप समाजसेवक विनोद इंगोले यांनी केला. या दूषित पाणी पुरवठ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ओसीडब्ल्यूने तातडीने या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.