esakal | चंद्रपूर : माराई देवीला बकरा चढवला अन् सोडला; मात्र...
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रपूर : माराई देवीला बकरा चढवला अन् सोडला; मात्र...

चंद्रपूर : माराई देवीला बकरा चढवला अन् सोडला; मात्र...

sakal_logo
By
संदीप रायपूरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी गावात माराई देवीला बकरा देण्याची प्रथा आहे. गावातील प्रत्येक जण आपापल्या परीने दहा-वीस रुपये जमा करून बकरा विकत घेतात. पूजा करून बकरा माराई देवीला चढवला जातो. यानंतर तो बकरा सोडण्यात येतो. मात्र, तो बकरा चोरण्याचा प्रयत्न भामट्यांनी केला. गावकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला अन् प्रयत्न फसला. करंजीत घडलेल्या या प्रकाराची रंजकदार चर्चा सुरू आहे.

खेड्यात माराई देवीला मोठे महत्त्व आहे. विशेषतः श्रावण मासात गावागावात माराई देवीची पूजाअर्चा केली जाते. लोक वर्गणी गोळा करून बकरा विकत घेतात आणि देवीला बहाल करून सोडून देतात. गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावातही लोकांनी वर्गणी केली आणि बकरा विकत घेतला. माराई देवीची पूजा केली अन् बकऱ्याला सोडून दिले. या बकऱ्यावर गावातील तीन भामट्यांची नजर होती.

हेही वाचा: गृहमंत्र्यांच्या नावे खंडणी; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

रविवारी रात्रीच्या सुमारास सारे झोपले असतील म्हणून तिघांनी बकरा चोरण्याचा बेत आखला. एकाने खांद्यावर बकरा घेतला व दूरवर जाण्याच्या तयारीत होता. याचवेळी गावातील एकाने हा प्रकार बघितला. त्याने बोंबाबोंब करताच बकऱ्याला सोडून ते पसार झाले. दुसऱ्या दिवशी या मुद्यावर तंटामुक्त समितीची बैठक झाली. बकरा चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी कबुलीही दिली.

सारी बाजू लक्षात घेत समितीने त्यांच्यावर तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. परंतु, गावातील काहींनी पोलिसांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. माराईदेवीला बहाल केलेला बकरा चोरण्याचा प्रयत्न करण्याच्या घटनेची रंजकदार चर्चा आता परिसरात सुरू आहे.

हेही वाचा: पुलावरून विद्यार्थ्याची उडी; चंद्रपूर जिल्ह्यात आढळला मृतदेह

अखेर गुन्हा दाखल

बकरा चोरी करण्याचा प्रयत्न फसल्याची माहिती मिळताच प्रकरण तंटामुक्त समितीकडे गेले. तंटामुक्त समितीने भामट्यांवर तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. परंतु, काहींनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. यांनतर त्या भामट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

loading image
go to top