नागपूरात चिमुकल्यासह चौघांना ओमिक्रॉन; १३३ जण कोरोनाच्या विळख्यात | Omicron | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron

नागपूरात चिमुकल्यासह चौघांना ओमिक्रॉन; १३३ जण कोरोनाच्या विळख्यात

नागपूर : नागपूर जिल्‍हयावर ओमिक्रॉन व्हेरियंटसह (Omicron Variant) कोरोनाचे दुहेरी संकट घोंगावत आहे. कोरोनाच्या भयाखाली असताना अचानक ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सहा वर्षांच्या चिमुकल्यासह ४ जणांना ओमिक्रॉनने विळख्यात घेतले आहे. तर कोरोनाचाही ब्लास्ट असल्याची स्थिती जिल्ह्यात आहे. कोरोनाचे दिवसभरात दिवसभरात १३३ नव्या बाधितांची भर पडल्याने चक्क प्रशासनाही हादरले. (Nagpur Corona And Omicron Updates)

जिल्ह्यात ओमिक्रॉन व्हेंरियंटच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अवघी ६ ओमिक्रॉनबाधितांची संख्या असताना अचानक सोमवारी (ता.३) आणखी ४ रुग्णांची भर पडली. यामुळे आता जिल्ह्यात दुहेरी आकड्यात ओमिक्रॉन पोहचला. १० ओमिक्रॉन बाधित झाले. विशेष असे की, अवघा ६ वर्षाचा चिमुकला ओमिक्रॉनच्या विळख्यात सापडल्याने भय वाढले आहे.

हेही वाचा: 'उजनी'च्या निर्मितीनंतर उत्तर ध्रुवीय बीनहंसचे पहिल्यांदाच आगमन

ओमिक्रॉन बाधितांमध्ये दोघे तरुण दुबई रिटर्न आहेत. एक महिला लंडनहून परतलेली आहे. नागपुरात पहिला ओमिक्रॉनबाधित १२ डिसेंबरला २०२१ रोजी आढळला होता. चार ओमिक्रॉनबाधितांमध्ये सतरंजीपुरा झोनमधील ४७ वर्षीय महिलेचा समावेश आहे. लंडनहून १७ डिसेंबरला विमानाने दिल्ली विमानतळावर पोहचली. शासन निर्देशानुसार तिची तिथे कोविडची चाचणी केली.

अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे त्याच दिवशी विमानाने नागपूरला पोहचली. काही तासांपूर्वीच चाचणी झाली असल्याने नागपूरात चाचणी केली नाही. गृहविलगीकरणात महिला होती. दुसऱ्यांदा २३ डिसेंबरला आरटीपीसीआर केल्यानंतर कोरोनाची बाधा झाल्याचे २४ डिसेंबरला प्राप्त अहवालातून स्पष्ट झाले. खबरदारीचा उपाय म्हणून जिनोम सिक्वेंसिंगसाठी पुण्याच्या एनआयव्हीकडे नमूने पाठवले.

ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे सोमवारी (ता.३) स्पष्ट झाले. २६ डिसेंबरला दुबईतून परतलेल्या २ तरूणांना कोरोनाची बाधा झाली. ओमिक्रॉन तपासणीसाठी जिनोम सिक्वेंसिग केले. त्यात हे दोघीहा बाधित आढलले. यातील एक जण चंद्रपुरातील नागभिड येथील ३६ वर्षीय तरुण तर गोंदियाच्या तिरोडा येथील २८ वर्षीय तरूणाचा ओमिक्रॉनबाधित समावेश आहे. ते दोघेही कामाच्या शोधात दुबईला गेले होते. दुबईतील शारजा येथून थेट विमानाने ते २६ डिसेंबरला नागपूरविमानतळावर पोहचले होते.

ओमिक्रॉनरुग्णांबाबत अशी होते हय गय

२० डिसेंबर २०२१ रोजी युगांडा येथून परतलेल्या माय लेकाची नागपूरच्या विमानतळावर चाचणी केली. त्यात महिलेसह ६ वर्षीय मुलाचा अहवाल कोरोनाबाधित आला. यांचे नागपुरात घर आहे. महापालिकेने नागपुरातच गृहविलगीकरणात राहण्याची सक्ती करण्याची गरज होती. परंतु अहवाल सकारात्मक आल्यानंतर महापालिकेचे वैद्यकीय पथक नागपुरातील घरी धडकले. परंतु माय लेक आपल्या अमरावती येथील घरी निघून गेले होते.

दरम्यान त्यांच्या अहवाल सकारात्मक आल्याचे सांगितल्यानंतर ते अमरावती येथील रुग्णालयात भरती झाले.ओमिक्रॉनच्या जिनोम सिक्वेंसिंगकरिता पुण्याच्या प्रयोगशाळेकडे नमूने पाठवले असता, ६ वर्षीय मुलाचा अहवाल ओमिक्रॉनबाधित आढळला. तर मातेचा अहवाल प्रतीक्षेत आहे. नागपुरात विलगीकरणात मायलेक असते, तर इतरांच्या संपर्कात हे आले नसते, असा हलगर्जीपणा कोरोना तसेच ओमिक्रॉनच्या वाढीस कारणीभूत ठऱत असल्याची चोरदार चर्चा मेडिकल वर्तुळात आहे.

तारीख ओमिक्रॉनबाधित

-१२ डिसेंबर२०२१ - पहिला ओमिक्रॉनबाधित

-२३ डिसेंबर - दुसरा ओमिक्रॉनबाधित

-२७ डिसेंबर - तिसरा ओमिक्रॉनबाधित

-२९ डिसेंबर - तीन जण ओमिक्रॉनबाधित

-३ जानेवारी २०२२ -चार जण ओमिक्रॉनबाधित

हेही वाचा: चंद्रपूर : चालबर्डी परिसरात आढळला वाघिणीचा मृतदेह

कोरोनाचे सक्रिय रुग्ण सव्वापाचशे पार

सोमवारी १३३ नव्या कोरोनाबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यात तिसरी लाट आल्याचे संकेत आहेत. मे २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरली. जूननंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली. जुलैमध्ये रुग्णसंख्या तीसच्या खाली आली होती. यापूर्वी ७ जून २०२१ रोजी म्हणजेच दुसरी लाट ओसरत असताना जिल्ह्यात १३४ बाधितांची नोंद झाली होती. त्यात शहरातील ५४, ग्रामीणमध्ये ७७ असे बाधित होती. सोमवारी (ता.३) २०२२ रोजी जवळपास पावने सात महिन्यानंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्येने उच्चांकी गाठली आहे.

सोमवारी जिल्ह्यात ५ हजार ४०९ चाचण्या झाल्या. यात शहरातुन १०५, ग्रामीणमधून २० व जिल्ह्याबाहेरील ८ अशा १३३ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ३० वर आली होती. मात्र बाधितांचे प्रमाण वाढले. आज घडिला शहरात ४४८, ग्रामीणमध्ये ४५ व जिल्ह्याबाहेरील ३३ असे तब्बल ५२६ वर सक्रिय कोरोनाबाधित आहेत.

Web Title: Omicron Variant Nagpur District Patient

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NagpurOmicron Variant
go to top