नागपूरात विदेशी प्रवास न करता ६ जण ओमिक्रॉनबाधित | Omicron | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron patients

नागपूरात विदेशी प्रवास न करता ६ जण ओमिक्रॉनबाधित

नागपूर : विदेशी प्रवासाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तींचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवले असता त्यातील सहा जणांना ओमिक्रॉनची (Omicron variant) बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात अवघ्या पंधरा दिवसात ३० ओमिक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यातील बहुतांश बाधितांची विदेश प्रवासाची पार्श्वभूमी आहे. ओमिक्रॉनसोबतच कोरोनाचा आकडा दर दिवसाला फुगत आहे. गुरुवारी (ता.६) नव्याने ४४१ कोरोनाबाधित आढळून आले. यामुळे अवघ्या सहा दिवसात १ हजार ४१८ रुग्णांची नोंद झाली आहे. (Nagpur District Omicron Updates)

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये १० हजार १२३ चाचण्या झाल्या. यात ४४१ नवीन बाधित आढळले. नागपूर शहरात बाधितांचे प्रमाण ८.२० टक्क्यांवर पोहचले आहे. शहरात दिवसभरात ४ हजार ६१९, ग्रामीणमध्ये १ हजार ६२४ अशा एकूण जिल्ह्यात ६ हजार २४३ संशयितांच्या चाचण्या झाल्या. त्यात शहरात ३७९, ग्रामीणमध्ये ३९, जिल्ह्याबाहेरील २३ असे एकूण जिल्ह्यात ४४१ बाधित आढळले.

हेही वाचा: नागपूरात खासगी शाळांना ऊत; दरवर्षी मंजुरीसाठी ३०० प्रस्ताव

शहरात कोरोनाबाधितांचे प्रमाण ८.२० टक्के आहे. तर ग्रामीण भागात २.४० टक्के आहे. गुरुवारी आढळलेल्या ४४१ रुग्णांमुळे आजपर्यंत बाधितांची संख्या ४ लाख ९५ हजार ३६७ वर पोहचली आहे. तर आज ३६ कोरोनामुक्त झाले. यामुळे आतापर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या ४ लाख ८३ हजार ७६० वर पोहचली आहे.

जिल्ह्यात १४८४ कोरोनाबाधित

जिल्ह्यात दीड महिन्यापूर्वी ३९ कोरोना बाधित होते. परंतु, अचानक कोरोना आणि ओमिक्रॉनची संख्या वाढल्याने आता शहरात १ हजार २६६ तर ग्रामीण भागात १६० आणि जिल्ह्याबाहेरील ५८ असे एकूण १ हजार ४८४ सक्रिय बाधित आहेत. एक रुग्ण दहा ते बारा जणांना बाधित करतो. यामुळे यांच्यावर महापालिका कशी नजर ठेवणार हा खरा प्रश्न आहे. गंभीर संवर्गातील रुग्णांवर विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: नागपूर जिल्ह्यात ४६६ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू

दुबई रिटर्न तरुण ओमिक्रॉनबाधित

दिवसाआड ओमिक्रॉनने बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज ६ ने भर पडून ३० वर गेली आहे. यात १८ वर्षी दुबई रिटर्न तरूणासह ४४, ६३ वर्षीय महिला, ३० व ३२ वर्षीय तरुणी तसेच ३७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दुबई रिटर्न हा १८ वर्षीय तरुण शहरातील मंगळवारी झोन मधिल रहिवासी असल्याचे सांगण्यात येते.ही व्यक्ती २६ डिसेंबर रोजी नागपुरला आली. २७ डिसेंबरला त्याचा अहवाल कोरोनाबाधित आला.

त्याचा एक नमुना जणुकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविला. गुरुवारी (ता.६) रोजी ओमिक्रॉन बाधित असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय ओमिक्रॉन बाधितांची भारतातीलच प्रवासाची पार्श्चभूमि आहे. यातील ६३ वर्षीय महिला व ३७ वर्षीय पुरुष हे हनुमाननगर झोन परिसरातील रहिवासी असून, एकाच कुटुंबातील आहेत. त्यांच्याच कुटुंबातील इतरही दोन व्यक्ती ओमिक्रॉनने बाधित झाले असल्याचे सांगण्यात येते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top