शारजाहून नागपुरात आले विमान; शंभर प्रवाशांची चाचणी अन्...

आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी एक-एक करीत शंभर प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली
plane
planeplane
Updated on

नागपूर : स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. रविवारी सकाळी पाऊणेसात वाजता शारजाह-नागपूर आंतरराष्ट्रीय विमान उतरले. ओमिक्रोनचे सावट घोंघावत असल्याने सारेच दहशतीमध्ये होते. सारे वातावरण चिंताग्रस्त होते. तणावाच्या वातावरणात महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी एक-एक करीत शंभर प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली. तब्बल दीड ते दोन तास नमुने घेतले. जोपर्यंत अहवाल येत नाही, तोपर्यंत प्रवाशी विमानतळावरच थांबले होते. मनात धास्ती होती. सुदैवाने कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही.

आप्त स्वकीय येणार म्हणून नातेवाइकाला घेण्यासाठी एकीकडे गर्दी केली होती. मात्र, शारजा विमानातून येणाऱ्यांना विमानतळाच्या आतल्या परिसरात थांबवले होते. चाचण्या निगेटिव्ह आल्यामुळे साऱ्यांना सोडण्यात आले. मात्र, प्रवाशांचे राहण्याचे ठिकाण, संपर्क मोबाईल नंबर आदींची माहिती घेण्यात आली. यानंतरच त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याची अट घालण्यात आली.

plane
रशिया १,७५,००० सैनिकांसह हल्ला करण्याच्या तयारीत

तीन दिवसांनंतर पुन्हा सर्व प्रवाशांना संपर्क करण्यात येणार आहे. पुढील चाचणीत कोविड तपासणीनंतर नियमाप्रमाणे उपचार सुरू करण्यात येतील. ८ दिवसांनंतर पुन्हा सर्व शंभर प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार आहे. यात कोणताही प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आल्यास आमदार निवासातील कोविड सेंटरमध्ये राहावे लागणार आहे.

९५ प्रवासी शारजाहसाठी रवाना

ओमिक्रॉनचा नवीन व्हेरियंट राज्यात आढळला. यामुळे केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महापालिकेच्या वतीने विमानतळावर चाचणीसाठी व्यवस्था केली होती. एअर अरेबियाचे शारजाह ते नागपूर विमान उतरल्यानंतर सर्वांना वेगळ्या कक्षात थांबविले होते. नागपूर ते शारजाह प्रवास करणाऱ्या ९५ प्रवाशांची चाचणी करून विमानात प्रवेश देण्यात आला. आंतरराष्ट्रीय विमानातील येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली आहे.

plane
Family Dispute : सात पैकी पाच मुलींना घेऊन आईने केली आत्महत्या

गृह विलगीकरणातील प्रवाशांवर पथकाची नजर

ओमिक्रॉनचा संक्रमण पसरू नये यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शासनाच्या सूचनेनुसार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. रविवारी सकाळी शारजाहून विमान आल्यानंतर विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी कक्षात पाठविण्यात आले. निगेटिव्ह अहवालानंतर प्रवाशांना गृहविलगीकरणात राहण्याची सूचना केली. महापालिकेच्या पथकाची नजर असणार आहे. हे पथक दुसऱ्या, चौथ्या व सातव्या दिवशी संबंधित प्रवाशाच्या घरी जाऊन माहिती घेणार आहे. प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्यांना वैद्यकीय उपचारासाठी मेडिकल, मेयोत पाठवण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com