Nagpur: जीर्ण झालेल्या सिवेज लाइनवर ५० कोटी लिटर पाण्‍याचा भार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur: जीर्ण झालेल्या सिवेज लाइनवर ५० कोटी लिटर पाण्‍याचा भार

Nagpur: जीर्ण झालेल्या सिवेज लाइनवर ५० कोटी लिटर पाण्‍याचा भार

sakal_logo
By
राजेश प्रायकर ः @rajeshp_sakal

नागपूर : शहरातील जवळपास एक हजार किलोमीटरच्या सिवेज लाइन जीर्ण झाल्या असून प्रत्येक वस्तीमध्ये सांडपाणी तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी नागरिकांच्या घरांमध्ये सांडपाणी परत येत आहे. याविषयी केलेल्या तक्रारीकडे अधिकारीही दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या जीर्ण सिवेज लाइनवर शहरातून दररोज निघणाऱ्या पाचशे एमएलडी अर्थात ५० कोटी लिटर पाण्याचा भार आहे.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

शहरातील घरांची तसेच बहुमजली इमारतींची संख्या वाढली. गेल्या दहा वर्षात लोकसंख्याही ३० लाखांपर्यंत गेली. वाढलेले शहर, इमारती, लोकसंख्येनुसार शहरातील पायाभूत सुविधांमध्येही वाढ झाली. रस्ते मोठे झाले, नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या. परंतु, जुन्या जीर्ण सिवेज लाईन बदलण्याकडे अद्यापही महापालिकेचे लक्ष नाही. संपूर्ण शहरात एकूण १४७५ किलोमिटर लांबीच्या सिवेज लाइन आहेत. यातील जवळपास हजार किलोमीटरच्या सिवेज लाईन जीर्ण झाल्या आहेत. धरमपेठ, सीताबर्डी, महाल, इतवारीसारख्या वर्दळीच्या भागात तर इंग्रजकालीन सिवेज लाइन असून त्या पूर्णपणे जीर्ण झाल्या आहेत. थोडीफार दुरुस्ती करून महापालिका तात्पुरते मलमपट्टी करते. मल आणि सांडपाण्याचा समावेश असलेले ५० कोटी लिटर पाणी सिवेजमधून वाहून जाणे धोकादायक ठरत आहे. सोबतच प्लॅस्टिक,बहुमजली इमारतींमधील सॅनिटरी नॅपकिन फ्लशच्या माध्यमातून सिवेज लाइनमध्ये येत असल्याने तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे घरांमध्ये पाणी जमा होऊन नागरिकांना नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: टीम इंडियाकडून ब्लॅक कॅप्सला व्हाइट वॉश!

सिवेज लाइनवर अतिक्रमण

काही नागरिकांनी सिवेज लाइनवरच बांधकाम केल्याने तुंबलेल्या सिवेज लाइन प्रवाहित करण्यास कर्मचाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.ज्यांनी अतिक्रमण केले, त्यांच्या बाजूच्या घरांमध्ये सांडपाणी शिरत आहे. त्यामुळे वाद, भांडण होत असून शहराचे सामाजिक आरोग्यही बिघडत आहे.

"शेजाऱ्याने सिवेज लाईनवर अतिक्रमण केले. परिणामी सिवेज लाईन तुंबली व फुटली आहे. त्यामुळे शेजाऱ्याच्या घरातील घाण व सिवेजचे सांडपाणी थेट घरात स्वयंपाक खोलीपर्यंत येत आहे. धंतोली झोनमध्ये फेब्रुवारीमध्ये लेखी तक्रार केली. पण अधिकारी लक्ष देत नाहीत."

-विशाखा रामटेके, कौशल्यायननगर, प्रभाग ३३

loading image
go to top